शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहरातील मंगलगेट येथे दोन गटात राडा: सचिन जाधव, पवन भिंगारेसह १८ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:52 IST

शहरातील मंगलगेट येथे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरन दोन गटात चांगलाच राडा झाला़ तलवार, चाकू लांकडी दांड्याचा वापर करन एकमेकांना मारहाण झाली. 

अहमदनगर : शहरातील मंगलगेट येथे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरन दोन गटात चांगलाच राडा झाला़ तलवार, चाकू लांकडी दांड्याचा वापर करन एकमेकांना मारहाण झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून, शिवसेनेच नगरसेवक सचिन जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर उपजिल्हाध्यक्ष पवन भिंगारे यांच्यासह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मंगलगेट येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रशांत बापू काळे यांच्यासह अक्षय भिंगारे, तुषार मुळे, मयूर कराळे हे देवीच्या मंदिराजवळ उभा असताना त्या ठिकाणी पवन भिंगारे, अन्नू भिंगारे, सोन्या भिंगारे, मयूर भिंगारे, विठ्ठल उपळकर, रोहन निंबाळकर, शुभम लोंकरकर, स्वप्निल भिंगारे, अभिषेक भिंगारे यांच्यासह २० ते २५ आले़ रागाने का पाहतो असे म्हणत या जमावाने तलवार व लाकडी दांड्याने मारहाण केली, असे प्रशांत काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चंद्रा परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगलगेट हवेली येथे दुकानात असताना स्वप्नीन बेंद्रे, अक्षय भिंगारे, प्रशांत काळे, तुषार मुळे, किशोर बेंद्रे, नंदू बेंद्रे, ओंकार साळवे, सतीश काळे, नगरसेवक सचिन जाधव यांनी चाकुने मारहाण केली़ याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात शक्तीप्रदर्शन

मंगलगेट येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दोन्ही गट फिर्याद दाखल करण्यासाठी आले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. पोलीसांनी अनेकांना प्रवेशद्वाराबाहेरच थांबविले़ यावेळी राष्ट्रवादीचे नगरसवेक व पदाधिकारी तर सेनेचेही पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही गटाने यावेळी ठाण्यातही शक्तीप्रदर्शन केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस