शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Municipal Election : काँग्रेसचा बालेकिल्ल्यात भोपळा : केडगावात भाजप, सेनेचे प्रत्येकी चार उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:46 IST

महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या केडगावमधील प्रभाग १६ मध्ये शिवसनेचे चार, तर प्रभाग १७ मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या केडगावमधील प्रभाग १६ मध्ये शिवसनेचे चार, तर प्रभाग १७ मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे़ तेथे काँगे्रसमधून भाजपात गेलेल्या मनोज कोतकर यांनी विजय मिळविला आहे़केडगाव येथे शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्यामुळे येथील निवडणुकीला विशेष महत्व आले होते़ त्यातच काँगे्रसचे सर्व आठ उमेदवार ऐनवेळी भाजपात दाखल झाले़ हे आठही उमेदवार हमखास विजयी होतील, अशी अटकळ बांधली जात होती़ त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ भाजपाने मोठी ताकद केडगावात लावली होती़ शिवसेनेनेही भयमुक्तीचा नारा देत केडगावात प्रतिष्ठा पणाला लावली होती़ केडगावातील प्रभाग सोळामध्ये सर्व चारही शिवेसेनेचे उमेदवार विजयी झाले तर प्रभाग सतरामध्ये सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत़ त्यामुळे आठ जागा असलेल्या केडगावात शिवसेनेला चार व भाजपला चार जागा मिळाल्या आहेत़ तर काँगे्रसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावात यंदा काँगे्रसला खातेही खोलता आलेले नाही़ विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग १६ (अ) मध्ये शिवसेनेच्या शांताबाई शिंदे, (ब) सुनीता कोतकर, (क) गणेश भोसले, (ड) अमोल येवले वियजी झाले, तर प्रभाग १७ (अ) भाजपचे राहुल कांबळे, (ब) गौरवी नन्नावरे, (क) लता शेळके, (ड) मनोज कोतकर हे विजयी झाले आहेत़

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक