शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अहमदनगर महापालिका स्थायी समिती इतिवृत्ताच्या मंजुरीत कोट्यवधींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 19:06 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्देबाळासाहेब बोराटे यांचा आरोप बेकायदेशीरपणे जागा भाड्याने

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये गतवर्षात झालेल्या स्थायी समितीच्या आठ सभांचे इतिवृत्त (सभेतील मंजूर विषयाचा सविस्तर अहवाल, चर्चा व घेतलेला निर्णय) कायम करण्यासाठी सभेसमोर होते. यामध्ये २०१६ या वर्षातील १७ डिसेंबर, २०१७ या वर्षातील १६ फेब्रुवारी, १४ मार्च, १० एप्रिल, ३ जून, ३ जुलै, २८ आॅगस्ट, २९ सप्टेंबर अशा एकूण आठ सभांच्या इतिवृत्ताचा समावेश होता. या सभेबाबत बोराटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सदरचे इतिवृत्त सविस्तरपणे वाचावे. त्यावर चर्चा होवून ते मंजूर करावे, अशी मागणी सभापतींकडे केली होती. मात्र त्यात काही गडबड असल्यानेच त्यावर सभापतींनी चर्चा होवू दिली नाही. प्रत्यक्ष सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर न घेतलेले विषय इतिवृत्तात समावेश करून त्यावर चर्चा झाल्याचे भासविण्यात आले आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला, तर त्याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार राहतील. केवळ तीन दिवसांच्या सभेचा अजेंडा काढल्याने इतिवृत्तावर अभ्यास करण्यास सदस्यांना वेळ मिळाला नाही.तारकपूर येथे एका खासगी रुग्णालयासाठी एका डॉक्टरांच्या समुहाला कोट्यवधी रुपयांची जागा भाडेपट्ट्याने दिली आहे. तो विषय सभेत अनाधिकृतपणे घुसडण्यात आला आहे. नेहरु मार्केट आणि प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुलाच्या निविदा प्रस्तावाला शासनाने स्थगिती दिली आहे. असे असताना सदरचे विषय मंजूर केल्याचे इतिवृत्तात नमूद केले आहे, असा आरोप करीत सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे बोराटे म्हणाले. जबाबदार अधिकारी नसतील तर सभा घेवू नका, असे आमचे म्हणणे होते. मात्र आमची मागणी सभापतींनी फेटाळली. नगरसेविका कलावती शेळके, मुदस्सर शेख, संजय लोंढे यांनीही इतिवृत्त मंजुरीस विरोध केला. 

त्याचा माझ्याशी संबंध नाही.ज्या मागील सभांचे इतिवृत्त मंजूर केले, त्यातील बहुतांश विषयांमध्ये सूचक व अनुमोदक म्हणून बाळासाहेब बोराटे हेच आहेत. सर्व विषय पूर्वीच्या सभापतींच्या काळात मंजूर झाले होते. मी आठ महिन्यांपासून सभापती आहे. इतिवृत्तात मोठा घोटाळा झाला असेल तर तो माजी सभापतींच्या काळातील आहे. त्याचा माझ्याशी संबंध नाही.-सुवर्णा जाधव, सभापती

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका