शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. सुजय विखेंचे तुफान : 3 लाख मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:45 IST

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची बनवली होती. पवारांनी जोर लावूनही राष्ट्रवादीला मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली.    सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच डॉ.विखे यांनी आघाडी घेतली. डॉ.सुजय विखे यांना 7 लाख 04 हजार 660 मते मिळाली तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मते मिळाली.  सर्वच मतदारसंघातून विखे यांना लीड मिळाली आहे. सवार्धिक लीड राहुरी मतदारसंघातून मिळाले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 54 हजार 248 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 64.26 टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना 6 लाख 3 हजार 976  मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना 3 लाख 95 हजार 569 मतं मिळाली होती.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये 63.40 टक्के, राहुरी66.77 टक्के, पारनेर 66.10 टक्के, अहमदनगर शहर60.25 टक्के, श्रीगोंदा 64.75 तर कर्जत-जामखेडमध्ये 64.10० टक्के मतदान झाले.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होती. काँग्रेसच्या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. निवडणुकीपुर्वी ही जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विरोेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र शरद पवार यांनी विखे यांना जागा सोडली नाही. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी भाजपात दाखल होत निवडणुक लढवली. भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून डॉ.सुजय विखे यांना मैदानात उतरवले तर राष्ट्रवादीने ऐनवेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. मात्र या सर्व लढतीत डॉ. सुजय विखे यांनी एकतर्फी विजय मिळविला. 

ही पाहा आकडेवारी

विधानसभाडॉ.सुजय विखे (BJP)आ.संग्राम जगताप(NCP)विखे यांचे लीड
कर्जत-जामखेड1,02,341+78,215+24,126+
श्रीगोंदा1,09,109+78,511+30,598+
नगर शहर1,08,860+55,738+53,122+
पारनेर1,17,081+80,372+36,707+
राहुरी1,23,417+53,501+69,916+
शेवगाव-पाथर्डी1,27,700+68,086+59,614+
एकूण 7,04,6604,23,1862,81,474 (अंतिम आकडेवारीनुसार)

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर