शिर्डी : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या यशासाठी मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील भल्या पहाटे लोणीवरून शिर्डीसाठी पायी निघाल्या आहेत. पहाटे तीन वाजता निघालेल्या शालिनी विखे थोड्यात वेळात साई दरबारी पोहोचणार आहेत.पहाटे साडेचार वाजता होणा-या काकड आरतीला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थित राहून साईंना यशासाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश राव चौधरी भाजपाचे सचिन तांबे व शिवसेनेचे सचिन कोते उपस्थित होते.
अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: सुजय यांच्या यशासाठी आईचे साईबाबांना साकडे : दोन खासदारांनी घेतले साईदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 09:04 IST