शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ : आजपासून लोकसभेची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:35 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचनेच्या प्रसिद्धीसोबतच आजपासूनच (दि. २८) उमेदवारी अर्जही दाखल करता येणार आहेत

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचनेच्या प्रसिद्धीसोबतच आजपासूनच (दि. २८) उमेदवारी अर्जही दाखल करता येणार आहेत. ४ एप्रिल हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.द्विवेदी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार हेमा बडे, नायब तहसीलदार पी. डी. गोसावी यावेळी उपस्थित होते. नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांसह केवळ ४ जणांनाच दालनात येता येईल.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरता येईल. अर्ज भरण्याच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणापासून १०० मीटर परिसरात या प्रक्रियेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तीनपेक्षा जास्त वाहने आणि ४ पेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन या ठिकाणामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. उमेदवारांच्या सुविधेसाठी उमेदवार सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नामनिर्देशन पत्र वाटप, अनामत स्वीकृती, नामनिर्देशन पत्राची छाननी आणिउमेदवारांना आवश्यक ते माहिती साहित्य वाटप करण्याचे कामकाज या कक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे.अर्ज दाखल करण्याचे ठिकाण - जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगरअर्ज दाखल करण्यास प्रारंभ - २८ मार्च ते ४ एप्रिलवेळ - रोज सकाळी ११ ते दुपारी ३ (सार्वजनिक सुटी वगळता)अर्जांची छाननी - ५ एप्रिलअर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - ८ एप्रिलमतदान - २३ एप्रिलमतमोजणी - २३ मे (सरकारी गोदाम, एमआयडीसी, नगर)साडेअठरा लाख मतदारया मतदारसंघात एकूण २०३० इतके मतदान केंद्र असणार आहेत. यात ११ सहाय्यकारी मतदानकेंद्रांचा समावेश आहे. अहमदनगर मतदारसंघात एकूण १८ लाख ४६ हजार ३१४ मतदार आहेत. यात ९ लाख ६६ हजार ७९७ पुरुष, तर ८ लाख ७९ हजार ४३१ स्त्री मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या ८६ इतकी आहे. या मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या ६ हजार ७९० इतकी असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.महिला कर्मचाऱ्यांचेच केंद्रअहमदनगर लोकसभा मतदारसंघातील २०३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राची सर्व जबाबदारी ही महिला अधिकारी-कर्मचारी यांना दिली जाणार आहे.आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारीसी व्हीजिल अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या ३५ तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात आले आहे. याशिवाय, मतदार यादीतील नाव तसेच अनुषंगिक माहितीसाठी आतापर्यंत १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर २००१ इतके दूरध्वनी आले. त्यांचे समाधान करण्यात आले. आचारसंहिता जारी केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २ हजार ७६८ लिटर अवैध दारु जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील १२५० शस्त्रपरवाना जमा करण्यात आले आहेत, तर १६ हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंधू यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९