शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये? ही तर गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 14:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिथे पंधरापेक्षा कमी रुग्ण आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर ...

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिथे पंधरापेक्षा कमी रुग्ण आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २७ असली तरी तीन रुग्ण घरी सोडण्यात आले असून बरेचशे रुग्ण हे विदेशी, परप्रांतीय आहेत. त्यामुळे अहमदनगरच्या रुग्णांचा विचार केला तर नगरमध्ये ही संख्या १५ पेक्षा कमी आहे. त्यामुळेच राज्य शासनाने अहमदनगरचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच राहणार आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. मात्र आॅरेन्ज झोनमध्ये समावेश झाल्याने नगरकरांना दिलासा मिळणार आहे.रुग्ण संख्येनुसार जिल्ह्यांचे रेड, आॅरेन्ज आणि ग्रीन झोन करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तीन झोनची निर्मिती करण्यात आली आहे. १५ पेक्षा जास्त रुग्ण असलेले जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत. १५ पेक्षा कमी रुग्ण संख्या असलेले जिल्हे आॅरेन्ज झोनमध्ये गेले आहेत, तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.२७ रुग्ण असुनही अहमदनगर जिल्ह्याचा आॅरेन्ज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. रुग्ण संख्या २७ असली तरी बरे झालेल्या तीन रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. आठ रुग्ण परप्रांतीय व विदेशी आहेत. २७ मधून बारा वजा केले असता १५ रुग्णसंख्याच राहते. जे रुग्ण मुळचे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नगरचा समावेश बहुतेक आॅरेन्ज झोनमध्ये केला असण्याची शक्यता आहे.