शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नगरचे हिलस्टेशन विकासापासून वंचित; मांजरसुंबा गडाची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 19:23 IST

डोंगरद-या, हिरवाईने नटलेला परिसर आणि समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंचीवर असलेला मांजरसुंबा गड म्हणजेच नगरचे हिलस्टेशन विकासापासून दूर आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गडावर जाणा-या पर्यटकांसाठी काहीच सुविधा नाहीत. या ऐतिहासिक गडाचीही मोठी पडझड झाली आहे.

ठळक मुद्देडोंगरद-या, हिरवाईने नटलेला परिसर आणि समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंचीवर असलेला मांजरसुंबा गड म्हणजेच नगरचे हिलस्टेशनमांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी पर्यटक येतात. या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरणही होते. सुटीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठी संख्या येथे असते. महालाच्या समोरील बाजूस तीन कारंजी आहेत. डोंगरावर इतक्या उंचीवर तयार केलेला पोहण्याचा तलाव हे इथले वैशिषया गडाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना आदी ऐतिहासिक ठिकाणे येथे आहेत.

अहमदनगर : डोंगरद-या, हिरवाईने नटलेला परिसर आणि समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंचीवर असलेला मांजरसुंबा गड म्हणजेच नगरचे हिलस्टेशन विकासापासून दूर आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गडावर जाणा-या पर्यटकांसाठी काहीच सुविधा नाहीत. या ऐतिहासिक गडाचीही मोठी पडझड झाली आहे.मांजरसुंबा येथील डोंगरावर बांधलेला महाल म्हणजे मांजरसुंबा गड होय. या गडाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना आदी ऐतिहासिक ठिकाणे येथे आहेत. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर डोंगरगण आणि गोरक्षनाथ गडाच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावर निझामशाहीतील बादशहांच्या विश्रांतीसाठी हा महाल बांधण्यात आला.

‘मर्दानखाना’ या नावाने ओळखल्या जाणा-या या महालाचे काही अवशेषच आता उरले आहेत. ही जागा मांजरसुंबा गावाची असून येथे जाण्यासाठी ग्रामस्थांनी २ लाख रूपये खर्चून रस्ता केला पण तो आता खराब झाला आहे. सध्या मात्र हा रस्ताही खराब झाला आहे.

पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी येतात पर्यटक

मांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी पर्यटक येतात. या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरणही होते. सुटीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठी संख्या येथे असते. महालाच्या समोरील बाजूस तीन कारंजी आहेत. डोंगरावर इतक्या उंचीवर तयार केलेला पोहण्याचा तलाव हे इथले वैशिष्ट्य आहे. हा तलाव व कारंजासाठी डोंगराच्या पोटात टाक्या तयार करून तेथे पावसाचं पाणी साठवलं जातं. हे पाणी उपसण्यासाठी हत्ती मोट होती. गार व गरम पाण्याची सोय असलेला हमामखाना महालाजवळच आहे.

पुरातत्व विभागाकडे नोंद नाही

मांजरसुंबा गडाची पुरातत्व विभागाकडे नोंद नाही़ ही जागा ग्रामपंचायतीची आहे. या ठिकाणी पावसाळ्यात धबधबे असतात. तर इतर वेळी शुद्ध हवा असते, या ठिकाणी रोप वे करण्याचा प्रस्ताव आहे तर हॉटेल व इतर सोयीसुविधा देण्याची गावाची तयारी आहे तसेच वन विभागाने या ठिकाणी वृक्षारोपण करून हिरवाई करावी, असे मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर