शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

जलशक्ती अभियानात अहमदनगर जिल्हा अग्रेसर असेल : रिचा बागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:16 IST

केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानातही नगर जिल्हा अग्रेसर असेल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल,

शिर्डी : केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानातही नगर जिल्हा अग्रेसर असेल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांनी व्यक्त केला.केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील २५४ जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात राज्यातील आठ जिल्हे निवडण्यात आले असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी या पाच तालुक्यांचा समावेश आहे.या अभियानाच्या प्राथमिक तयारीसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी शिर्डीत आढावा बैठक घेतली. गटस्तरावरील कामांचे नोडल अधिकारी म्हणून केंद्र सरकारमधील संचालक सुप्रिया देवस्थळी, तांत्रिक बाबींचे नोडल अधिकारी म्हणून केंद्रीय जलसंशोधन केंद्र, पुणे येथील ए.के. आगरवाल यांचा या पथकात समावेश आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सामाजिक वनीकरणच्या विभागीय अधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख, पाचही तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते़ जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींचा जिल्हास्तरावर केलेल्या आराखड्याबाबत यावेळी चर्चा झाली. लोकसहभाग वाढावा, विविध यंत्रणांनी त्यांची कामे सुनियोजित पद्धतीने पूर्ण करावीत. निवड केलेल्या पाच तालुक्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, त्यासाठी पाऊस पाणी संकलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावी. नगरपालिका , ग्रामपंचायतस्तरावरील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्थांनी पाऊस पाणी संकलनासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याबाबत यावेळी बागला यांनी सूचना दिल्या़ शालेय पातळीवर यासंदर्भात निबंध, चित्रकला स्पधार्सारखे उपक्रम राबवावे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अधिकाधिक कामे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी वाघ यांनी जिल्हास्तरावर राबविण्यात येणाºया या अभियानाच्या आराखडा अंमलबजावणीबाबत संबंधितांना माहिती दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय