शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अहमदनगर जिल्हा रॉकेलमुक्तीच्या दिशेने

By चंद्रकांत शेळके | Updated: September 28, 2018 12:14 IST

गॅसधारकांचा शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसधारकांची वाढलेली संख्या, रॉकेलसाठी आधारसक्ती व आॅनलाईन रॉकेलविक्रीमुळे थांबलेला रॉकेलचा काळाबाजार या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून रॉकेलची मागणी झपाट्याने घसरली आहे.

चंद्रकांत शेळके अहमदनगर : गॅसधारकांचा शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसधारकांची वाढलेली संख्या, रॉकेलसाठी आधारसक्ती व आॅनलाईन रॉकेलविक्रीमुळे थांबलेला रॉकेलचा काळाबाजार या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून रॉकेलची मागणी झपाट्याने घसरली आहे.गेल्या दीड वर्षांत टँकरची संख्या २६३ वरून ५० वर आली आहे. त्यातही हळूहळू घट होत असल्यानेलवकरच जिल्हा रॉकेलमुक्त होणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसीन वितरण परिमाण राज्य शासनाने १९९७पासून निश्चित केले. तेव्हापासून अनुदानित रॉकेलची विक्री होण्यास प्रारंभ झाला. स्वयंपाकासाठी, तसेच दिवाबत्तीसाठी रॉकेलचा प्रामुख्याने उपयोग होत. परंतु कालांतराने गॅसधारकांच्या संख्येत वाढ झाली. पुढे शहरी व ग्रामीण भागाकरिता समान रॉकेल परिमाण ठेवण्याची मागणी न्यायालयात झाली. त्यामुळे शासनाने १ जुलै २०१५च्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार एका व्यक्तीस २ लिटर, दोघां व्यक्तीस ३ लिटर व ३ हून अधिक व्यक्तींना ४ लिटर रॉकेलचा कोटा निश्चित केला. याच आदेशानुसार एक किंवा दोन गॅसजोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल बंद करण्यात आले.परंतु किती ग्राहकांकडे गॅस आहे, याची माहिती संकलित होण्यात अडचणी येत असल्याने बऱ्याच गॅसधारकांना रॉकेलचा पुरवठा होत होता. त्यानंतर शासनाने १३ आॅक्टोबर २०१६ पासून रॉकेल ग्राहकांसाठी आधार सक्ती केली. आधार क्रमांक गॅस कंपनीकडे लिंकिंग असल्याने गॅसधारकांची अचूक संख्या समोर आली व त्यांचे रॉकेलवाटप घटले. मध्यंतरी शासनाने उज्ज्वला गॅस योजना आणली. त्यातही बरेच ग्राहक वाढल्याने रॉकेलचा कोटा दिवसेंदिवस कमी होत गेला.शासनाने सध्या शिधापत्रिकाधारकांसाठी पॉस मशिनद्वारे धान्य व रॉकेलवाटप सुरू केल्याने थेट लाभार्थ्यांनाच लाभ होत आहे. यातून होणारा काळाबाजार आपोआप थांबला गेला. या सर्व बाबींमुळे रॉकेलची मागणी झपाट्याने घटली आहे.मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्याला दर महिन्याला २६३ रॉकेल टँकरची (१ टँकर : १२ हजार लिटर) मागणी होती. परंतु त्यानंतर या संख्येत घट होऊन सप्टेंबर २०१८मध्ये ही मागणी ५० टँकरवर आली आहे. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांतील ही सर्वाधिक कमी मागणी आहे.नगर तालुक्याला मार्च २०१७मध्ये १० टँकर रॉकेल पुरवठा केला गेला. त्यानंतर ही मागणी कमी होत गेली आणि आॅक्टोबर २०१८ साठी तालुक्याकडून रॉकेलची मागणीच करण्यात आलेली नाही. म्हणजे जिल्ह्यात रॉकेलमुक्त होणारा नगर तालुका पहिला ठरला आहे.घरोघरी गॅसकनेक्शन वाढल्याने रॉकेलची मागणी घटली. शासनाच्या उज्ज्वला योजनेचाही त्यात मोठा वाटा आहे. सध्या जिल्ह्यात धान्य व रॉकेलवाटप पॉस मशिनने होत असल्याने थेट लाभार्थ्यालाच लाभ मिळत आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी घटली असून, ती दिवसेंदिवस कमी होत आहे. - संदीप निचित, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय