शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर जिल्ह्यात वाळूतस्करांना आता जामीन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:03 IST

जिल्ह्यात वाढती वाळूतस्करी प्रशासनाची डोकेदुखी ठरल्याने त्याची गंभीर दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस, आरटीओ, सरकारी वकील यांची संयुक्त बैठक घेऊन वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे ‘लोकमत’ची एक महिन्यापासून वाळूतस्करांविरुद्ध मोहीम जिल्हा प्रशासनाला अखेर आली जाग, संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

अहमदनगर : जिल्ह्यात वाढती वाळूतस्करी प्रशासनाची डोकेदुखी ठरल्याने त्याची गंभीर दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस, आरटीओ, सरकारी वकील यांची संयुक्त बैठक घेऊन वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. यापुढे वाळूतस्करांना जामीन मिळता कामा नये, असे सांगत त्यांनी सरकारी वकिलांना याप्रश्नी विशेष लक्ष घालण्याचे सूचित केले.जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने वाळू ठेकेदार बिनदिक्कतपणे वाळूउपशाचे नियम तोडून वाळू उपसत आहेत. याबाबत गेल्या महिनाभरापासून ‘लोकमत’ने वाळूउपशाचा गंभीर विषय चव्हाट्यावर आणला. त्यानंतर ग्रामस्थांनीच पुढे येऊन हनुमंतगाव व आघी येथील वाळूउपसा बंद पाडला. गेल्याच आठवड्यात राहुरी येथील तहसीलदार, पोलिसांवर वाळूतस्करांनी हल्ला केला. गेल्या महिनाभरापासून वाळूतस्करांचा हा उच्छाद पाहून अखेर जिल्हाधिकाºयांनी याविषयी सर्व अधिकाºयांची संयुक्त बैठक घेतली.गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर, अप्पर पोलीस अधीक्षक घनशाम पाटील, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व नगरचे उपप्रादेशिक अधिकारी, सर्व तहसीलदार, संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सरकारी वकील उपस्थित होते.महसूल अधिकारी वाळूतस्करांवर कारवाया करतात, परंतु त्यांना इतर विभागांची साथ मिळत नसल्याची तक्रार महसूल अधिकाºयांनी केली. वाळूतस्करांवर छापा टाकताना पोलिसांना कळवले तरी ते वेळेवर येत नाहीत. हद्दीच्या कारणावरून पोलीस येण्यास टाळाटाळ करतात. रस्त्यावर बिनदिक्कतपणे विनाक्रमांकाच्या वाहनांतून वाळूवाहतूक केली जाते, मग आरटीओ काय करतात, असा प्रश्न महसूल अधिकाºयांनी उपस्थित केला. त्याला आरटीओ समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.त्यानंतर सरकारी वकिलांचा मुद्दा चर्चेला आला. महसूल विभाग मोठ्या जिकिरीने अवैध वाळूची वाहने पकडते. परंतु वाळूतस्करांवर न्यायालयात काहीच कारवाई होत नाही. सरकारी पक्षाचे वकील समाधानकारक युक्तिवाद करीत नसल्याने न्यायालय केवळ या वाहनांतील वाळू काढून वाहने सोडून देण्याचे सांगते. यात तस्कर तर सुटतातच, परंतु शासनाचा महसूलही बुडतो. असे अनेक मुद्दे चर्चेला आले. यावर जिल्हाधिका-यांनी मार्ग काढत सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचाआदेश दिले. वाळूतस्करी सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली आहे. थेट महसूल अधिका-यांवर हल्ले होतात, ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे वाळूबाबत कडक पावले येत्या काळात उचलली जातील. महसूल व पोलिसांनी एकत्रित समन्वयाने काम करावे. आरटीओंनी अशी वाहने तातडीने पकडावीत. यापुढे कोणाचीही तक्रार चालणार नाही. वाळूतस्करांना जामीन न मिळण्याची संपूर्ण जबाबदारी सहायक संचालक (विधी) आनंद नरखेडकर, सर्व ५० सहायक सरकारी वकील आणि मुख्य सरकारी वकील सतीश पाटील यांच्यासह सर्व सहायक शासकीय अभियोक्ता यांच्यावर असेल. त्यांनी प्रभावी बाजू मांडून या तस्करांना शिक्षेपर्यंत पोहोचवावे.‘लोकमत’ने उठवला आवाजयासाठी सर्व सरकारी आणि सहायक सरकारी वकिलांच्या कामाचा प्रांत आणि तहसीलदार यांनी दर आठवड्याला आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले. जिल्ह्यात अवैध वाळूउपसा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सतत आवाज उठवला. नियमबाह्य ठेके देऊन वाळूउपशाला प्रोत्साहन दिले जाते यावरही ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. जनतेतून याबाबत लोकमतचे कौतुकही झाले. त्यानंतर आता जिल्हाधिकाºयांनीही वाळूप्रकरणी गंभीर दखल घेतल्याने हा विषय तडीस जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तहसीलदारांच्या बदनामीप्रकरणी होणार गुन्हा दाखलनेवासा येथील तहसीलदारांची सोशल मीडियात बदनामी केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर आयटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्याचा निर्णय यावेळी झाला. जिल्हाधिका-यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.प्रत्येक केंद्रावर पोलीस निरीक्षक नेमावेतनाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २५ जून रोजी मतदान होत असून, त्यासाठी जिल्ह्यात २० केंद्र आहेत. निवडणुकीचा आवाका व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता या प्रत्येक केंद्रावर पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा, अशी मागणी निवडणूक शाखेकडून उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर यांनी केली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय