शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

अहमदनगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३० टक्के : पुणे विभागात नगर तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 19:36 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला. गेल्या दोन वर्षांपासून नगरचा निकाल घसरत असून, यंदाही तिच परंपरा राहिली. नगर जिल्हा पुणे विभागात थेट तिसऱ्या स्थानी फेकला गेला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.०२, तर मुलींची टक्केवारी ९३.३१ आहे. एकूण ९७२ पैकी १२५ शाळांचे निकाल १०० टक्के लागले. जिल्ह्यात ९३.६५ टक्क््यांसह श्रीगोंदा तालुका अव्वल ठरला आहे.जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार २८७ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी ७२ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये ४१ हजार ४९५ मुले व ३१ हजार ३६० मुलींचा समावेश होता. यापैकी ६५ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये ३६ हजार ५२५ मुले व २९ हजार २६२ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.०२, तर मुलींची टक्केवारी ९३.३१ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त निकाल श्रीगोंदा तालुक्याचा ९३.६५ टक्के, तर सर्वांत कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा ८४. ४२ टक्के लागला.१९ हजार ८७२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतनगर जिल्ह्यातील एकूण ७२ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १९ हजार ८७२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. याशिवाय २५ हजार ६४३ जण प्रथम श्रेणीत, १७ हजार ६५९ द्वितीय श्रेणीत, तर २ हजार ९४७ विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.१७ रिपिटर प्रावीण्य श्रेणीतजिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा (रिपिटर) निकाल ३९.७७ टक्के लागला. जिल्ह्यातील २९५८ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली. यापैकी २९२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी १७ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १३० जणांना प्रथम श्रेणी, १७८ जण द्वितीय श्रेणीत, तर ८४० जणांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSSC Results 2018दहावी निकाल २०१८