शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय आग प्रकरण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू, निलंबन कारवाई चुकीची असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 12:17 IST

Ahmednagar : आग लागून जी दुर्घटना झाली त्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आरोग्य विभाग व विविध तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मृतांची उत्तरीय तपासणी झाली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे.

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काल पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी तीव्र पडसाद उमटले असून कर्मचारी संघटना पाठोपाठ डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे. आज सकाळी जिल्हा रुग्णालयाचे कामकाज बंद करून निषेध व्यक्त केला. 

चौकशी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवर गुन्हा दाखल करणे, त्यांना अटक करणे ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यायकारक असून, त्यांच्यावर दाखल गुन्हा मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी संघटना, राज्य शासन आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्याने जिल्हा रूग्णालयातील तातडीची सेवा वगळता सर्व विभाग बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे.

आग लागून जी दुर्घटना झाली त्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आरोग्य विभाग व विविध तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मृतांची उत्तरीय तपासणी झाली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. आगीच्या कारणाचा शोध सुरु आहे.  सदोष साहित्य वापरल्यामुळे धूर सर्वत्र पसरला असावा व त्यामुळे रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. अतिदक्षता विभागात पसरताच सर्व कर्मचारी तेथे मदतीसाठी धावून आले. स्वता:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना बाहेर काढले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केले. आग आणखी पसरू नये म्हणून मुख्य प्राणवायू पुरवठा खंडित करावा लागला. 

वेगाने पसरणारा काळा धूर या मुळे हवेतील प्राण वायूची कमतरता निर्माण होणे, या मुळे रुग्णाचा कमी कालावधीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्णसेवेच्या कामामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे डॉक्टर व परिचारिका यांना दोषी मानता येऊ शकत नाही. या दुर्घटनेची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तेथे तातडीने मदत कार्य व रुग्णसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर गुन्हा दाखल करणे, त्यांना अटक करणे ही कार्यवाही अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे. त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा सर्व राज्यभर या अन्यायकारक, चुकीच्या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात येईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhospitalहॉस्पिटल