शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद; विखे आंदोलनात; दोन कंपन्यांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:11 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद जिल्हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती जनआंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नगर शहरात आंदोलकांनी जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केल्याने पुणे-औरंगाबाद महामार्गाची वाहतूक बाह्यवळणमार्गे वळविण्यात आली आहे. नगर शहरातील आंदोलनात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेही सामान्य नागरिकांत रस्त्यावर बसले आहेत.   नगर शहरात एस.टी. बसेस, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद आहेत. तालुक्यांच्या ठिकाणीही सर्वत्र व्यवहार बंद आहेत. नगर एमआयडीसीत काही कंपन्यांनी कामकाज सुरु ठेवल्याने इंडियन सिमलेस व एक्साईड बॅटरी या कंपन्यांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कंपन्यांसमोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यात अग्निशमन वाहनावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नेवासा तालुक्यात तरवडी येथे काही दुचाकी फोडण्यात आल्या आहेत. मुस्लीम समाजाचा पाठिंबामराठा समाजाच्या आंदोलनाला मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला आहे. नगर शहरात मुस्लिम समाजाने आंदोलकांना फळ व पाणी वाटप केले. वकील मोफत खटले लढविणारमराठा समाज आंदोलनात ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्यांचे खटले मोफत लढविण्यात येतील अशी घोषणा वकिलांनी नगरच्या आंदोलनात केली.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा