शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण, डॉ.निलेश शेळकेचा जामीन खंडपीठाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:46 IST

अहमदनगर शहर सहकारी बँकेत वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी बोगस कर्ज घेतल्याप्रकरणी डॉ. निलेश शेळके याचा जामीन अर्ज गुरूवारी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. 

अहमदनगर : अहमदनगर शहर सहकारी बँकेत वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी बोगस कर्ज घेतल्याप्रकरणी डॉ. निलेश शेळके याचा जामीन अर्ज गुरूवारी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. नगरमध्ये एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने कर्ज प्रकरण करून घेत त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी दिलेली आहे.या फिर्यादीनुसार डॉ. निलेश शेळके याच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाºयांविरुद्ध फसवणूक व आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाला असून  याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान, डॉ. शेळके याने जिल्हा न्यायालयात याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे जामीन फेटाळला. यानंतर डॉ. शेळके याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली. गुरूवारी या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने शेळके याचा जामीन  अर्ज फेटाळला. फिर्यादींच्या वतीने अ‍ॅड. नारायण नरवडे यांनी काम पाहिले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयbankबँक