शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महावितरणला वादळी तडाखा, ११ खांब जमीनदोस्त, अनेक भागात अजूनही वीज नाही

By चंद्रकांत शेळके | Updated: April 10, 2023 16:25 IST

वादळात केवळ नगर शहरातीलच ११ खांब जमीनदोस्त झाले. शिवाय झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या.

अहमदनगर : शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतपिकांसह महावितरणलाही जोरदार झटका दिला. या वादळात केवळ नगर शहरातीलच ११ खांब जमीनदोस्त झाले. शिवाय झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या.  महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम  हाती घेतल्याने रविवारी दुपारपर्यंत काही भागातील वीजपुरवठा सुरू झाला. मात्र काही भागातील वीज सोमवारी दुपारपर्यंतही आलेली नव्हती. 

शनिवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात वीज यंत्रणांचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वीजवाहिनीवर झाडे पडली, कंडक्टर तुटले, तर काही ठिकाणी जम्प गेले. ग्रामीण उपविभाग व पारनेर तालुका अंतर्गत काही ११ केव्ही उच्च दाब वाहिन्या नादुरुस्त झाल्या होत्या. परंतु ग्रामीणच्या तुलनेत शहरात वादळी तडाखा अधिक बसला. त्यामुळे पूर्ण शहरासह सावेडी, केडगाव, दरेवाडी, भिंगार, एमआयडीसी या उपनगरांतही वीज खंडीत झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. अंधार असल्याने व नुकसान मोठे असल्याने दुरुस्तीमध्ये अडथळे येत होते. रात्री तीन-चार वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. रविवारी सकाळपासूनच दुरूस्ती सुरू होती. त्यामुळे दुपारपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरूळीत झाला.

परंतु सोमवारी सकाळी पुन्हा वीज खंडीत झाली. महावितरणने अनेक ठिकाणी रविवारी रात्री तात्पुरती दुरूस्ती केली होती. सोमवारी तेथे पुन्हा पक्की दुरूस्ती करण्यात येत असल्याने सोमवारी अनेक भागातील पुरवठा दिवसभर खंडित झालेला होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रात्री उकाड्याने, डासांनी नागरिक त्रस्त झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस