शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती

By सुदाम देशमुख | Updated: September 3, 2025 11:50 IST

अहिल्यानगरमध्ये ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील कळस येथील ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. पारनेर जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असणारा बेल्हे रानमळा परिसरात मंगळवारी रात्री ७ वाजता ही घटना घडली असून हल्लात ठार झालेला व्यक्ती गवंड्याच्या हाताखाली शेतमजूराचे काम करत होता.  मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारा कळस येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रानमळा रस्त्याला सुतार वस्तीजवळ घडली. आपले काम आटोपून गणेश गाडगे हे कळस गावाकडून रानमळ्याच्या रस्त्याने घरी येत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. रात्री आठ वाजेपर्यंत गणेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गणेश गाडगे यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.या घटनेमुळे पुन्हा एकदा कळस परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. यापूर्वीही जनावरांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत, परंतु मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, बिबट्यांचा धोका वाढल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोकादायक बनले आहे. विशेषत: शेतातून घरी परतताना आणि रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना सतत भय वाटते.

स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त, पिंजरे लावणे किंवा रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे यासारख्या खबरदारीच्या उपायांची गरज व्यक्त केली जात आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन आहे. ग्रामस्थांनी रात्री एकट्याने बाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.या दुर्दैवी घटनेमुळे गणेश गाडगेंच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरleopardबिबट्या