शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पुन्हा आंदोलनाची वेळ, हा सरकारचा कमीपणा : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:42 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

राळेगण सिद्धी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचे हजारे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमिवर ते म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी विकासकामांची गरज आहे. परंतु, भ्रष्टाचारामुळे विकासाला गळती लागली आहे. विकासकामे करणे व भ्रष्टाचार रोखणे ही दोन्ही कामे केल्याशिवाय समाज व देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीचे आश्वासन देणारांना सत्तेवर आल्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये आश्वासनांचा विसर पडला. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून देशहिताचे प्रश्न सोडविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी २३ मार्च या शहीद दिनापासून नवी दिल्लीत उपोषण केले. तेव्हा केंद्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी आश्वासनाची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही. गांधी जयंतीपर्यंत पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तेव्हाच दिला होता. गेल्या ५ महिन्यात आश्वासन पूर्तीसाठी सरकारकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. विविध कारणे देऊन सरकारने लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत वेळकाढूपणाचे धोरण चालविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असतानाही सरकारकडून कार्यवाही होत नाही.

राळेगणसिद्धी येथे गर्दी न करता कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात, तहसील कार्यालयासमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिंसात्मक व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. या आंदोलनाची माहिती राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्राद्वारे किंवा इ मेलने द्यावी. माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी आठ वर्षे संघर्ष करावा लागला. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळू लागला आहे. लोकपाल-लोकायुक्त कायद्यासाठीही मागील सरकारशी मोठा संघर्ष करावा लागला. आता त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सरकारशी संघर्ष सुरू आहे. लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीमुळे सर्वच भ्रष्टाचार संपेल, असा माझा दावा नाही. परंतु, भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल याची खात्री आहे. --अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे