शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

एमआयआरसीतील प्रशिक्षणानंतर १८५ जवान सैन्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:16 IST

अहमदनगर येथील मेकॅनाईज्ड इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) या लष्करी प्रशिक्षण केंद्रात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये १८५ जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.

अहमदनगर : येथील मेकॅनाईज्ड इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) या लष्करी प्रशिक्षण केंद्रात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये १८५ जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारी एमआयआरसीमधील ही सैन्याची ४२६वी तुकडी आहे. ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारी सकाळी शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे मैदानावर आगमन झाले. जवानांनी पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांना, दुसरी सलामी कर्नल रसेल डिसुजा यांना तर तिसरी सलामी एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर  वी. एस. राणा यांना दिली. प्रमुख पाहुणे लेप्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली व संचलनाची पाहणी केली. त्यानंतर जवानांनी आपापल्या धर्मगुरूंकडून धर्मग्रंथावर हात ठेवत देशरक्षणाची शपथ घेतली.प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा मारूत मिश्रा बेस्ट रिक्रुट ठरला. त्याचा जनरल सुंदरजी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तर रिक्रुट पिंड्राला राजू व रोहित कुमार यांना अनुक्रमे जनरल के. एल. डिसूजा रौप्यपदक व जनरल पंकज जोशी कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. रिक्रुट दिलप्रीत सिंह याला बेस्ट ड्रिल कॅडेटने गौरविण्यात आले. लेप्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन यांनी जवानांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. एक सामान्य नागरिकाचे सैन्यात रूपांतर करणारे या जवानांचे प्रशिक्षक, तसेच ज्यांनी देशसेवेसाठी आपली मुले सैन्यात दाखल केली  अशा उपस्थित जवानांच्या पालकांचे घुमन यांनी कौतूक केले. जवानांच्या पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला. शहीद हवालदार बने सिंह गुज्जर व शहीद जय सिंह बोरा या दोघांच्या पत्नींचा ‘वीरनारी’ म्हणून खास सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर