शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोळा वर्षानंतर कुटुंबावर पुन्हा काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:42 IST

अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला.. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती.

ठळक मुद्देनाशिकमधील बस अपघात : कुलकर्णी कुटुंबावर शोककळ

राजूर : अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती. या अपघातात नशिबाने वाचलेले दिपक प्रभाकर कुलकर्णी तर मंगळवारी ( ४ संप्टेबर) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भाबडबारी जवळ बस व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (३९) ठार झाले. यामुळे या कुटुंबाचा आधारच संपुष्टात आला.या वृत्ताने चितळवेढे गावाबरोबरच परिसरातील गावांमधून हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या दोन तीन पिढ्यांपासून कुळकर्णी कुटुंब चितळवेढे व परिसरातील गावांमध्ये भिक्षुकी करून गुजराण करत होते. पुढे प्रभाकर कुलकर्णी यांनी भिक्षुकी सुरु केली. लग्नानंतर या कुटुंबाला तीन मुले आणि एक मुलगी झाली. एक प्रामाणिक कुटुंब म्हणून परिसरात या कुटुंबाची ख्याती होती. मुले मोठी होऊ लागली, शालेय शिक्षण घेऊ लागली. सुखी संसाराचे दिवस सुरु झाले. मात्र नियतीच्या मनात वेगळच होत. सुमारे १६ वर्षा पूर्वी या कुटुंबातील मोठी मुलगी, दोन मुले व जावई, नातू देवदर्शनासाठी शनिशिंगणापूर-शिर्डी येथे गेले होते. त्यावेळी वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दोन मुले व त्यांची मुलगी ठार झाली. दिपकही या प्रवासास जाणार होता मात्र ऐनवेळी तो गेला नाही. कमावती झालेली मुले काळाच्या पडद्याआड गेली आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी पुन्हा भिक्षुकी सुरू केली. पुढे दीपक मोठा झाला. वेद मंत्र शिकला आणि परिसरात एक चांगला ब्राम्हण म्हणून त्यांनी नाव मिळविले. कुटुंबातील कर्ते मुले गेल्याचे दु:ख पचवत मोठ्या धक्क्यातून हे कुटुंब पुन्हा एकदा उभे राहिले. पुढे दिपकचे लग्न झाले. त्याला दोन मुले झाली. एक मुलगा त्रंबकेश्वर येथे वेद विद्या शिकत आहे तर दुसरा शालेय शिक्षण घेत आहे. दीपक पूजे निमित्ताने गावोगावी फिरू लागले. असाच प्रवास करताना आज मंगळवारी दुपारी नंदुरबारहून नाशिककडे येणा-या एस टी बसने प्रवास करत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि ते प्रवास करत असलेल्या बसचा तालुक्यातील भाबडबारीत येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपघातात दिपक यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. बसमधील आणखी ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.उतारवयात मोठे धक्के पचवत सावरत असलेल्या या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. दीपक यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच चितळवेढे सह परिसरातील गावांवर शोककळा पसरली. मयत दिपकच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेNashikनाशिक