शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हत्याकांडानंतर कोतकर गुंजाळच्या संपर्कात : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:44 IST

केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर भानुदास कोतकर हा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ व सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात होता

अहमदनगर : केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर भानुदास कोतकर हा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ व सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात होता. तसेच कोतकर याची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. केदार केसकर यांनी केला.केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भानुदास कोतकर याच्यावतीने जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला. कोतकरला राजकीय षडयंत्रातून गुन्ह्यात अडकविले आहे. तसेच तो दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने त्याला जामीन मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर सरकारी पक्षाने कोतकरची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर केडगाव हत्याकांड घडलेले आहे. केडगाव हे शहरापासून दूर आहे. त्यामुळे कोतकरला राजकीय द्वेषातून अडकवले असल्याच्या आरोपी पक्षाच्या म्हणण्यात तथ्य नाही, तसेच कोतकर यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसा जबाब स्वत: कोतकर यानेच सीआयडी अधिकाऱ्यांना दिला असल्याचेही केसकर यांनी स्पष्ट केले. या अर्जावर आता न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. दरम्यान सरकारी वकील यांनी कोतकर याच्याविरुध्द दाखल असलेल्या ३२ गुन्ह्यांची यादी न्यायालयासमोर सादर केली. हे सर्व गुन्हे जीविताशी निगडीत असल्याचे केसकर यांनी सांगितले. आरोपी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेत कोतकर याच्याविरुध्द कमी गुन्हे असल्याचे सांगितले. मात्र, तसे असल्यास न्यायालयाच्या सर्टीफाईड कॉपी सादर करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील केसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड