शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर कुकडीचे आवर्तन पुन्हा सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:09 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतर तातडीने बंद केलेले आवर्तन गुरुवारी पुन्हा सोडण्यात आले. 

श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतर तातडीने बंद केलेले आवर्तन गुरुवारी पुन्हा सोडण्यात आले. कुकडीचे आवर्तन २९ जुलैला सोडण्यात आले होते. कर्जत, करमाळा तालुक्यात पाणी गेले. पण श्रीगोंदा तालुक्यास पाणी मिळण्यास विलंब झाला. दरम्यानच्या काळात पाऊस झाला नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला विशेष झळ बसली. श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन चालू असताना कुकडीचे उपविभागीय कार्यालय अळकुटीला हलविण्यात येणार हे जाहीर झाले. परंतु जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी कुकडीचे तीन धरणे जुन्नर तालुक्यात आहेत. त्यामुळे उपविभागीय कार्यालय नगर जिल्ह्यात नेणे हा अन्याय आहे. आपण या मुद्यावर कुकडीचे पाणी नगर जिल्ह्यात जाऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. यावर पिंपळगाव जोगे, येडगाव, माणिकडोह धरणातून चालू असलेले आवर्तन बंद केले होते. याचे पडसाद श्रीगोंदा, पारनेर, कर्जत तालुक्यातील कुकडीचे लाभक्षेत्रात उमटले. त्यावर राष्टÑवादीने हा इशारा दिला होता. दरम्यान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाला गालबोट लागू नये म्हणून जलसंपदा विभागातील प्रशांत कडुसकर यांनी आमदार सोनवणे यांची मनधरणी करुन गुरुवारी दुपारी कुकडीचे आवर्तन पुन्हा सोडले.

टॅग्स :Waterपाणी