शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीनंतर काळ्या फिती लावूनच शिक्षक परतले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:08 IST

अहमदनगर : शिक्षकांची काढून घेण्यात आलेली हक्काची कुटुंब निवृत्ती योजना, आॅनलाईन व शालेय पोषण आहाराची किचकट नोंदणी पद्धत, शिक्षकांवर ...

अहमदनगर : शिक्षकांची काढून घेण्यात आलेली हक्काची कुटुंब निवृत्ती योजना, आॅनलाईन व शालेय पोषण आहाराची किचकट नोंदणी पद्धत, शिक्षकांवर टाकण्यात आलेला अशैक्षणिक कामांचा बोजा तसेच दर आठवड्याला निघणा-या नवनवीन शासन निर्णयामुळे शिक्षक वैतागले असताना २३ आॅक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून शिक्षकांनी अध्यापनाचे काम केले.शहरातील सेक्रेटहार्ट कॉन्व्हेंट, पंडित नेहरु हिंदी विद्यालय आदींसह जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी पहिल्या दिवशी काळ्या फिती लावत अध्यापन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, नाशिक विभागप्रमुख सुनील पंडित, सुहास धिवर, वैभव शिंदे, सुदेश छजलाने, विनित थोरात, विशाल महल्ले, कमल भोसले, मोनिका मेहतानी, शिल्पा पाटोळे, उज्ज्वला आदिक, उषा शौरान, अंजली मिश्रा, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.समान काम समान वेतन या संवैधानिक हक्काची पायमल्ली करत १ नोव्हेंबर २००५ रोजी शिक्षकांच्या हक्काची कुटुंब निवृत्ती योजना काढून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करुन, शिक्षकांच्या तोंडातून घास काढून घेण्यात आला असून, शिक्षकांच्या जीवनातील हा काळा दिवस आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्याकरिता शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचे स्वरुप बदलून त्यामध्ये जाचक अटीचा समावेश केला आहे. या जाचक अटीमुळे बहुसंख्य शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यापासून वंचित राहणार असून हा शासन निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक पध्दतीने लादण्यात येत असल्याची भावना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक