शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

 वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या

By चंद्रकांत शेळके | Updated: June 20, 2023 20:17 IST

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या.

अहमदनगर: गेल्या वर्षी ॲानलाईन आंतरजिल्हा बदली झाली, परंतु संबंधित जिल्ह्यात १० टक्केपेक्षा जादा रिक्त जागा राहत असल्याने कार्यमुक्त होऊ न शकलेेले ८९ शिक्षक आता वर्षभरानंतर कार्यमुक्त झाले असून त्यांना आता स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात नियुक्ती मिळणार आहे.

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या. यात इतर जिल्ह्यांतून २६५ शिक्षकांच्या बदल्या नगर जिल्ह्यात झाल्या. परंतु विहीत मुदतीत केवळ १७६ शिक्षक हजर झाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन करून जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या गेल्या. परंतु ८९ शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्तच केले नव्हते.

संबंधित शिक्षकाला नवीन जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. शिक्षण हक्क कायदा २००९ च्या कलम २६ अन्वये जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या १० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत. त्यामुळेच बदलीने रिक्त पदांचा रेशो १० टक्केपेक्षा खाली जात असल्याने या शिक्षकांना कार्यमुक्त केले गेले नव्हते. परिणामी बदली होऊनही हे शिक्षक त्याच जिल्ह्यात अडकून पडले. आता आंतरजिल्हा बदलीने पुन्हा हा रेशो राखला जात असल्याने संबंधित जिल्ह्यांतील प्रशासनाने या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. अखेर हे ८९ शिक्षक आता स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात बदलून आले आहेत. समुपदेशनाने पदस्थापनाआंतरजिल्हा बदलीने आलेल्या या ८९ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून समुपदेशनाने पदस्थापना दिली जाणार आहे. त्यासाठी दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषदेत समुपदेशन वर्ग आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील शिक्षकांना पडद्यावर दाखवून ही पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यासाठी संवर्ग १, संवर्ग २मधील शिक्षकांना आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद सभागृहात बोलावले जाणार आहे. शिक्षण विभागाने २१ जून रोजीच हा समुपदेशन वर्ग आयोजित केला होता. परंतु काही कारणास्तव तो पुढे ढकलला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक