नगर शहरात यंदा १२३ सार्वजनिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. कोरोनामुळे विसर्जन मिरवणूक व गर्दी करण्यास मनाई आहे. रविवारी शहरातील चौका चौकासह विसर्जन कुंडाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३ हजार १३१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यातील १५३ जणांना उत्सव काळात शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. १०४ जणांवर दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. १ हजार २५६ जणांना नोटीस देण्यात आली असून १ हजार ३२ जणांकडून बाॅंड लिहून घेण्यात आला आहे.
--------------
असा आहे पोलीस बंदोबस्त
८- पोलीस उपअधीक्षक
३५- पोलीस निरीक्षक
२० उपनिरीक्षक (ट्रेनिंग सेंटर)
१८००- पोलीस कर्मचारी
१५०- पोलीस कर्मचारी (बाहेरील जिल्ह्यातील)
१०००- होमगार्ड
राज्य राखीव दलाची एक प्लाटून
----------------------
येथे आहेत विसर्जन कुंड
बोल्हेगाव (गांधी नगर रोड, भारत बेकरी चौक), वडगाव गुप्ता रोड (मयूर कॉर्नर चौक, खासगी जागा) भिस्तबाग (तपोवन रोड, नाना चौक, खासगी जागा ), निर्मल नगर (साईबाबा मंदिर खुली जागा ), पाईपलाईन रोड (यशोदा नगर विहीर ), बालिकाश्रम रोड (महालक्ष्मी उद्यान जवळ, खासगी जागा ), गंगा उद्यान (मिस्कीन मळा), नेप्ती नाका, कल्याण रोड (बाळाजी बुवा विहीर), सीना नदी पात्र सारसनगर (भिंगार नाल्यालगत सारसनगर पुलाशेजारी खासगी जागा), बुरूडगाव रोड (साईनगर उदयान), स्टेशन रोड (शिवनेरी चौक, खासगी जागा), केडगाव लिंक रोड (क्रांती चौका जवळील, खासगी जागा), केडगाव मोतीनगर (बुद्धविहार शेजारील खुली जागा ), केडगाव देवी मंदिर समोरील जागा, केडगाव मधुर मिलन मंगल कार्यालय शेजारील (खासगी जागा), मुकुंदनगर (गोविंदपुरा मारूती मंदिराजवळ), दाणे डबरा, पांजरपोळ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जागा)
-------------