आतापर्यंत ४७२ कोरोना बाधितांनी या कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. ११ जणांना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले. सध्या १६ कोरोना बाधित कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. आतापर्यंत लोकवर्गणीतून सहा लाख रुपये खर्च झाले आहेत. कोरोना सेंटरला आयडी नंबर मिळाला नाही, तो प्रशासनाने मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. मंत्री तनपुरे यांनी पिचड कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर दिले होते ते तालुका प्रशासनाने समशेपूरपर्यंत पोहचू दिले नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी आढळा विभागाचे कार्यकर्ते संजय थोरात, बाबासाहेब उगले, केशव बोडके, दत्ता जाधव, नीलेश सहाणे, बाबासाहेब वाकचौरे आदी उपस्थितीत होते.
............
समशेरपर येथील पिचड कोविड सेंटरला प्रशासनाने औषधे पुरवठा केला. वैद्यकीय अधिकारी व परिचय, आरोग्य सेविका, सेवक आदि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशासनाचे या कोविड सेंटरकडे दुर्लक्ष झालेले नाही.
- मुकेश कांबळे, तहसीलदार