शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले-बाळासाहेब थोरात; नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 15:24 IST

देशात, राज्यात कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही नियमांसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण त्यांना सहकार्य करा, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

संगमनेर : देशात, राज्यात कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही नियमांसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण त्यांना सहकार्य करा, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.  येथील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या प्रांगणात शुक्रवारी महसुलमंत्री थोरात यांनी फिजीकल डिस्टन्स ठेवत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.  मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक, कुरण येथील परिस्थितीची माहिती घेत तेथील नागरिकांची गैरसोय होवू नये याकरिता प्रशासनाला सूचना केल्या.  कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहून करीत आहोत. या संकटात महसूल, पोलीस आणि आरोग्य विभाग प्रभावीपणे काम करीत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करीत गोरगरिब, गरजू नागरिक, मजूर, परराज्यातील कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे कार्य कौतूकास्पद आहे.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ बुद्रूक, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन देखील थोरात यांनी केले. 

ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. संगमनेर शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिट पुरविण्याचे काम करीत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा आॅनलाईन मागणीद्वारे पुरविले जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर