दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त कृषक समाज संघटना व दिवंगत नगरसेवक सुभाष गांगड मित्रमंडळाच्या वतीने कांदा मार्केट चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याचे लोकार्पण पत्रकार बाळासाहेब आगे, अनिल पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अविनाश आदिक बोलत होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, युवा नेते अद्वैत आदिक, पत्रकार पद्माकर शिंपी, प्रदीप आहेर, ज्ञानेश गवले, गोविंद साळुंखे, प्रवीण जमदाडे, जयेश सावंत आदींची उपस्थिती होती.
अविनाश आदिक म्हणाले, शहरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक या चांगले काम करत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी शहरातच नव्हे, तर तालुक्यात अनेकांना मदतीचा हात दिला. आता शहरातील सर्वच रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे याठिकाणी या चौकाचे रूपडे पालटले.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रास्ताविक करताना शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी डॉ. रवींद्र जगधने, डॉ. वसंत जमधडे, नगरसेवक श्यामलिंग शिंदे, कलीम कुरेशी, संतोष कांबळे, रवी पाटील, प्रकाश ढोकणे, दीपक चव्हाण, रईस जागीरदार, दीपक चरण चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष अल्तमश पटेल, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, महिला शहराध्यक्ष अर्चना पानसरे, कृषक समाज संघटनेचे शहराध्यक्ष अनंत पतंगे, जयंत चौधरी, ऋषी डावखर, रामभाऊ औताडे, वसंत पवार, भागचंद औताडे, दीपक निंबाळकर, नितीन गवारे, अप्पा आदिक, हंसराज आदिक, राजेंद्र पानसरे, सोहेल दारूवाला, सैफ शेख, तौफिक शेख, सोमनाथ गांगड, आदी उपस्थित होते.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दिव्यांगांना रेनकोट, प्रतिकारशक्ती वाढविण्याची औषधे, मास्क, सॅनिटायझर या वस्तूंचे वाटप करण्यात आले. युवा नेते अद्वैत आदिक यांनी आभार मानले.
---
फोटो ओळी : आदिक
शहरातील कांदा मार्केट परिसरातील चौकाचे सुशोभीकरण करताना अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधा आदिक.
----