शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधील अनियमिततेबाबत कारवाई होणारच : पालक सचिव आशिषकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:08 IST

जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये अनियमितता आढळल्यास ठेकादारांवर दंडात्मक कारवाई होईल. याशिवाय जर टँकरच्या जीपीएस यंत्रणेचे रेकॉर्ड नसेल, तर त्या ठेकेदारांची बिलेच अदा होणार नाहीत.

अहमदनगर: जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये अनियमितता आढळल्यास ठेकादारांवर दंडात्मक कारवाई होईल. याशिवाय जर टँकरच्या जीपीएस यंत्रणेचे रेकॉर्ड नसेल, तर त्या ठेकेदारांची बिलेच अदा होणार नाहीत. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती मोठ्या प्रमाणावर असली, तरी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती पालक सचिव आशिषकुमार यांनी दिली.आशिषकुमार यांच्या उपस्थितीत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टंचाई स्थिती असून प्रशासनाने त्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.सध्या साडेसातशेहून अधिक टँकर व सुमारे पाचशे छावण्या सुरू करून त्यातून तीन लाखांपेक्षा जास्तजनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. ‘लोकमत’ने नुकतेच जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाºया टँकरचे स्टिंग करून त्यातील अनियमितता चव्हाट्यावर आणली, याबाबत आशिषकुमार यांना विचारले असता, ते म्हणाले, अशी अनियमितता झाली असेल, तर त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल. टँकरच्या खेपा निश्चितीसाठी असलेली जीपीएस यंत्रणाही बहुतांश ठिकाणी बंदच असते, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, जीपीएस यंत्रणेवर संबंधित बिडीओंचे नियंत्रण असते. त्याचे रेकॉर्ड नसेल तर संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले जाणार नाही.जिल्ह्यात टंचाई उपाययोजना होतात का? उन्हाळ्यात किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, धरणांत उपलब्ध असणाºया पाण्याची स्थिती, त्याचे नियोजन कसे केले, याबाबतची माहिती घेऊन आशिषकुमार यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.... तर अधिका-यांवर कठोर कारवाई होईलच्रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या. टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी. दुष्काळी स्थितीमध्ये अधिकाºयांनी दक्षतेने व गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. त्यात दिरंगाई करणाºया अधिकाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दुष्काळी अनुदान, पीएम किसान योजना, पीकविमा, पीककर्ज याबाबत शेतकºयांना त्रास होता कामा नये. संबंधितांनी हे पैसे तातडीने शेतकºयांच्या खात्यात वर्ग करावेत. पाणी पुरवठा योजना थकीत वीज देयकांच्या कारणामुळे बंद असतील तर त्या योजना पुन्हा सुरु कराव्यात, असे निर्देश आशिषकुमार यांनी टंचाई आढावा बैठकीत दिले.‘तो’ अधिकार जिल्हाधिका-यांनाटँकर सुरू करताना त्यातील टाकीच्या वजनाचे प्रमाणिकरण आरटीओंकडून करून घेण्याची तरतूद शासकीय आदेशात आहे. परंतु नगरमधील टँकर ठेकेदारांनी असे प्रमाणिकरण आरटीओंऐवजी पंचायत समितीच्या उपअभियंत्यांकडून करून घेतले, याबाबत आशिषकुमार यांना विचारले असता, त्यांनी याबाबत जिल्हाधिकाºयांना विचारले. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक तालुक्यात आरटीओ नसल्याने त्याचे अधिकार पंचायत समितीच्या उपअभियंत्यांना दिले. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेऊ शकतो.छावणीचालकांना टॅगिंग करावीच लागेलशासनाने कोणतीही पूर्वतयारी नसताना छावणीचालकांना टॅगिंग अनिवार्य केले आहे. जनावरांना टॅगिंग करून रोज त्यांचा स्कॅन घेणे शक्य नाही. याशिवाय शासनाला पारदर्शकताच तपासायची होती तर टॅगिंगची प्रणाली छावण्या दोन महिन्यापूर्वी सुरू झाल्या तेव्हाच सुरू करणे गरजेचे होते, आता छावण्या अंतिम टप्प्यात आल्या असताना टॅगिंगचा उद्देश सफल होईल का, यावर आशिषकुमार यांनी शासनाच्या निर्णयानुसार टॅगिंग करावेच लागेल, असे सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर