शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेत चुलता-पुतणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:30 IST

अकोले तालुक्यातील विठा घाटातील दरीत झाडाच्या एकाच फांदीस तालुक्यातील पाभूळवंडी येथील एकाच कुटुंबातील चुलता व त्याची अल्पवयीन पुतणी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

राजूर : अकोले तालुक्यातील विठा घाटातील दरीत झाडाच्या एकाच फांदीस तालुक्यातील पाभूळवंडी येथील एकाच कुटुंबातील चुलता व त्याची अल्पवयीन पुतणी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.तालुक्यातील पाभूळवंडी येथील उत्तम गणपत जाधव(३५) व त्याच्या चुलत भावाची मुलगी भारती रामदास जाधव(१७) या दोघांचे मृतदेह विठा घाटातील एका सुबाभळीच्या झाडास लटकलेले होते. या बाबतची बातमी विठा येथील पोलीस पाटील दत्तात्रय भागाजी वाकचौरे यांनी पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे सहायक फौजदार रावसाहेब कदम,रवींद्र वाकचौरे, किशोर तळपे, दिलीप डगळे व इतरांसह घटनास्थळी दाखल झाले. उंच झाडाच्या फांदीस चादरीचा पट्टा तयार करून या दोघांनी शेजारी शेजारी त्यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले.मयत भारती दहावीचा पेपर देण्यास मंगळवारी गेली होती. त्यानंतर ती घरी आलीच नसल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता आपली मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची तक्रार मयत भारतीची आई अलका रामदास जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर काही वेळातच ही घटना उघडकीस आली. बुधवारपासूनच या परिसरात पाऊस सुरू झाला होता त्यामुळे मृतदेह खोल दरीतील झाडास लटकलेले असल्याने ते काढण्यात अडचणी येत होत्या. स्थानिकांच्या मदतीने बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान हे मृतदेह घाट रस्त्यावर आणण्यात आले. यानंतर हे दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत शवविच्छेदन काम सुरू होते. यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे सहायक फौजदार प्रकाश निमसे यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदर निमसे करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले