शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’तंर्गत गुन्हा दाखल करावा : खासदार अमर साबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:34 IST

किरण उद्धव जगताप हा दलित आणि सर्वसामान्य आहे. तो आपले काहीच करू शकणार नाही याची जाणीव मारेकऱ्यांना होती़

अहमदनगर : किरण उद्धव जगताप हा दलित आणि सर्वसामान्य आहे. तो आपले काहीच करू शकणार नाही याची जाणीव मारेकऱ्यांना होती़ म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली़ पोलिसांनी या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी खासदार अमर साबळे यांनी केली़साबळे यांनी रविवारी दुपारी नगर येथे मयत किरण याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले़ यावेळी बोलताना साबळे म्हणाले, किरण याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींविरोधात पुरावे एकत्र करावेत, तिघा आरोपींना अटक केली असली तरी या घटनेत आणखी आरोपी आहेत़ त्यांचा शोध घ्यावा़या खटल्यात शासनाने उज्ज्वल निकम यांच्या दर्जाच्या सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे़ तसेच किरण याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे़ किरण याला मारहाण होऊन एक महिना उलटून गेला होता तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती़ याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे़ अपर पोलीस अधीक्षक यांच्यासोबत याबाबत चर्चा करणार असल्याचे साबळे यावेळी म्हणाले़ यावेळी वसंत लोढा, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सुवेंद्र गांधी, चंद्रकांत काळोखे आदी उपस्थित होते़दरम्यान या घटनेप्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढणार असल्याचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले़काय आहे प्रकरणनगर शहरातील पुणे बसस्थानकावर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिवनेरी बसचे तिकीट घेत असताना रांगेत किरण आणि जहागिरदार नावाच्या व्यक्तींमध्ये वाद झाला़ यावेळी जहागिरदार याने फोन करून काही तरुणांना बोलावून घेतले़ त्यांनी किरण याला लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण केली़ यात किरण याच्या डोक्याला गंभीर मार लागला़ त्याच्यावर एक महिन्यापेक्षा काळ जास्त हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ अखेर ४ जून रोजी किरण याचा मृत्यू झाला़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस