शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात पोलीस कोठडीतून आरोपी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:09 IST

दुहेरी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शंकर बारकू शिंदे (वय ५५) हा आरोपी बुधवारी पहाटे श्रीगोंदा पोलीस कोठडीची कौले तोडून फरार झाला. मात्र त्यास पोलिसांनी एका तासात पकडून पुन्हा जेरबंद केले. 

श्रीगोंदा : दुहेरी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शंकर बारकू शिंदे (वय ५५) हा आरोपी बुधवारी पहाटे श्रीगोंदा पोलीस कोठडीची कौले तोडून फरार झाला. मात्र त्यास पोलिसांनी एका तासात पकडून पुन्हा जेरबंद केले.  शेडगाव येथील दुहेरी खून प्रकरणात शंकर शिंदे हा आरोपी आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी संध्याकाळी त्याने आजारी पडल्याचे नाटक केले. यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस कोठडी समोरील पडवीत ठेवले. याच संधीचा फायदा घेऊन त्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास पडवीच्या छतावरील काही कौले काढली. रात्री सामसूम झाल्यानंतर त्याने येथून धूम ठोकली. शिंदे पळाल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. त्याची शोधाशोध केल्यानंतर आरोपी शिंदे हा बोरुडेवाडी येथील एका लिंबोणीच्या बागेत लपला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने लगोलग जाऊन आरोपी शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली. दरम्यानच्या काळात पोलिसांची झोपच उडाली होती. याप्रकरणी आरोपी विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संदीप पितळे करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.....सीसीटिव्ही कॅमे-याची तपासणी होणार श्रीगोंदा येथील पोलीस कोठडीचे कौल काढून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी शंकर शिंदे पळून गेला. यावरुन पोलिसांच्या कारभाराचे पिळत उघडे पडले आहे. नेमणुकीवर असणारे पोलीस नेमके काय करत होते याचाही उलगडा होणे गरजेचे आहे. कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नेमका काय आणि कसा प्रकार घडला हे सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेजवरून समोर येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी