कोपरगाव : ३ वर्षांपासून मोक्कातील फरार आरोपी भागवत भारम भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) याला पोलिसांनी सोमवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पढेगाव शिवारातील उसाच्या शेतातून शिताफीने जेरबंद केले आहे.
ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस हवालदार इरफान शेख, अनिस शेख, अशोक काळे, अंबादास वाघ, जयदीप गवारे, फुरखान शेख यांच्या पथकाने केली आहे. आरोपी भोसले याच्यावर कोपरगाव शहर ठाण्यात चार गुन्हे तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. भोसले यास मंगळवारी (दि.११) कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.