अहमदनगर : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कुकाणा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. रोहित अशोक पुंड (वय १९, रा. तरवडी, ता. नेवासा) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुकाणा येथे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरखाली रोहित पुंड याचा मृत्यू झाला. गावातील मुख्य रस्त्यावरच हा अपघात झाला. अपघातानंतर कुकाणा, तरवडी व परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करीत कुकाणा येथील तरवडी चौकात नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर रास्ता रोको केला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रोहित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
कुकाण्यात तरुणाचा अपघाती मृत्यू; ग्रामस्थांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:06 IST