शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अबब... पाथर्डी पालिकेचा जेसीबी अडीच वर्षापासून गायब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:52 IST

पालिकेचा दुरुस्तीच्या नावाखाली अडीच वर्षापासून गायब असलेला जेसीबी, गाळ्यांचे बेकायदा हस्तांतरण, दुषित पाणीपुरवठा

पाथर्डी : पालिकेचा दुरुस्तीच्या नावाखाली अडीच वर्षापासून गायब असलेला जेसीबी, गाळ्यांचे बेकायदा हस्तांतरण, दुषित पाणीपुरवठा, कर्मचा-यांचे नगरसेवका विरुद्ध नियमबाह्य आंदोलने आदी मुद्या वरून पालिकेची मासिक सभा वादळी ठरली.पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते. नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी शहरातील उपनगरात सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले असून तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरा बाहेर सांडपाणी वाहून जाण्यसाठी योग्य व्यवस्थापणाची गरज असल्याचे सांगितले. नियमानुसार प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक प्रमाणात सांडपाणी तयार होत नसल्याने सध्या नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रस्ताव सादर करू, असे आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांनी सांगितले.नगरसेविका दिपाली बंग यांनी त्यांच्या प्रभागात पाईप लाईन लिकेज असल्याने मैला मिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून नवीन पाइप लाईन टाकण्याची मागणी करत मैला मिश्रीत पाण्याच्या बाटल्या मुख्याधिकारी यांना भेट दिल्या. पालिकेचा जेसीबी गेल्या अडीच वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली गायब आहे. तो कुठे नेऊन ठेवला आहे, असे पालिका मुख्याधिकारी व सभागृहाला विचारले. नगरसेवक बंडू बोरुडे यांनी पालिकेचा जेसीबी गायब असल्याने पालिकेला भाडोत्री जेसीबी घ्यावा लागला. त्यापोटी लाखो रुपये भाडे अनाठाई द्यावे लागल्याचे सांगितले. त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. गर्जे यांनी जेसीबी नगरला दुरुस्तीला पाठवला असून अद्यापि त्याचे दुरुस्ती अंदाज पत्रक तयार नसल्याचे सांगितले. त्यावेळी सर्वच नगरसेवकांनी जेसीबी परत आला पाहिजे असे सांगितले.प्रवीण राजगुरू यांनी सार्वजनिक शौचालयाचा आज पर्यंत झालेल्या खर्च सभागृहां समोर मांडण्याची मागणी केली. त्यावेळी अभियंता संजय गिरमे यांनी आजपर्यंत शौचालयाच्या कामासाठी १५ लाख रुपये खर्च झाला असून अजून १२ संडासचे कामे सुरु असल्याचे सांगितले. बंडू बोरुडे यांनी पालिकेच्या गाळ्याचे ५० हजार घेवून बेकायदा हस्तांतरण करणारावर जबाबदारी निश्चित करा, असे सांगितले. त्यावर डॉ गर्जे यांनी संबधितावर जबाबदारी निश्चित करा, असे सांगितले. या उत्तराने समाधान न झाल्याने सविता भापकर यांनी या सर्व प्रकाराला नगराध्यक्ष देखील जबाबदार आहेत असे सांगतले. नगरसेवक महेश बोरुडे यांनी पालिका कर विभागाचे कर्मचारी नवनाथ आमले यांना धारेवर धरत चुकीच्या पद्धतीने बाजार वसुली ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याबाबत जाब विचारला. यावेळी नगरसेवक नंदकुमार शेळके, अनिल बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविका मंगल कोकाटे, शारदा हंडाळ, संगीता गटांनी, सुनिता बुचकुल, सविता भापकर, सविता डोमकावळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी