आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणे उभे राहता आले आहे. यातूनच काही विद्यार्थी डॉक्टर्स, अभियंता झाले आहेत. तालुक्यातील काही शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दहा रुपये महिना या प्रमाणे वार्षिक १२० रुपयांची वर्गणी जमा करून आधारचे सामूहिक सदस्यत्व स्वीकारले आहे. जिल्हा परिषदेच्या वेल्हाळे, पोखरी हवेली, गोर्डेमळा, निळवंडे, गारोळे पठार, धांदरफळ बुद्रुक, तळेगाव दिघे, हंगेवाडी या शाळेतील शिक्षकांनी, तसेच श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालय, नान्नज दुमाला येथील सर्व शिक्षकांनी यापुढेही दरवर्षी जुलै महिन्यामध्ये वार्षिक वर्गणी देण्याचे कबूल केले आहे. शिक्षकांची ही सामाजिक बांधिलकी नक्कीच सर्व क्षेत्रातील लोकांना प्रेरणादायी आहे. या मदतीतून निराधार गरजू होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जात आहे.
आधार फाउंडेशनच्या ‘दहा रुपयांची किमया’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST