शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

By अरुण वाघमोडे | Updated: June 14, 2024 16:38 IST

या घटनेनंतर शुक्रवारी मुलाचे आजोबा सुरेश डहाके, माजी नगरसेवक निखिल वारे व परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

अहमदनगर: शहरातील तवले नगर येथील शिवशंभो गृहनिर्माण सोसायटीत घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिवार्थ शेखर डहाके असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.या घटनेनंतर शुक्रवारी मुलाचे आजोबा सुरेश डहाके, माजी नगरसेवक निखिल वारे व परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी वारे म्हणाले गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नगर शहरात महापालिकेची मोकट कुत्रे पकडणारी यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांचा मानवी वस्ती परिसरात मोठा वावर वाढला असून ते माणसांवर हल्ले करत आहेत.महापालिका मात्र या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. भविष्यात अशा काही घटना घडल्या याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे. त्यामुळे मनपाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :dogकुत्राhospitalहॉस्पिटल