शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

घरात घुसला आणि अडकला; बंद घरात आढळला बिबट्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 20:48 IST

शवविच्छेदन अहवालानंतर बिबट मृत्यूचे खरे कारण समजेल असे वनरक्षक अंकुश काकड यांनी सांगितले.

Akole Leopard News: अकोले बंद घरात माणूस मृतावस्थेत आढळल्याची उदाहरणे आहेत. पण, चक्क बिबट्या देखील बंद घरात मृतावस्थेत आढळला. परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. अकोले शहराजवळ नवीन नवलेवाडी येथे दुबळकुंडी रोडवर मध्य वस्तीत हा प्रकार घडला. 

नवीन नवलेवाडी इथं वर्दळीच्या रस्त्यालगत एक जुने पडके घर आहे. या घरात एक-दीड वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत गुरुवार सकाळी आढळला. दोन-तीन दिवसांपूर्वीच तो मयत झाला असावा. बुधवारी महाशिवरात्र असल्याने रस्त्याने वर्दळ होती. पण, या बंद घराजवळची दुकाने बंद होती. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान या घरातून दुर्गंधी सुटल्याची बाब शेजारी संतोष काठे व किसन चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी दरवाजातून आत डोकावून पाहिले तर मृत बिबट दिसला. माजी उपसरपंच राकेश देशमुख यांनी वनखात्यास ही बाब कळवली. वनकर्मचारी रामहारी आंबरे, सूर्यभान नरवडे यांनी नागरिकांच्या मदतीने बिबट्यास सुगाव वन रोपवाटिकेत नेले. शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर बिबट मृत्यूचे खरे कारण समजेल असे वनरक्षक अंकुश काकड यांनी सांगितले. बिबट्याचा मृत्यू का?बंद घरात घुसण्यासाठी पाठीमागून छोटी जागा होती. तेथून बिबट्या आत घुसला. पण, बिबट्या आत घुसताना तेथे काही अडगळीचे सामान होते ते खाली पडले व हा रस्ता बंद झाला. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. या घराशेजारी कुक्कुटपालन असल्याने तेथील पक्षांचा आवाज सुरु असतो. त्यामुळे या बिबट्याने डरकाळी फोडल्यानंतरही त्याचा आवाज बाहेर कुणालाही आला नाही. जास्त दिवस आत राहिल्याने पाणी व अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरleopardबिबट्या