अहमदनगर : जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांतील ९९ टक्के मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. केवळ २४ मतदारांचीच छायाचित्रे प्राप्त नाहीत. त्यामुळे छायाचित्रांसह मतदार यादी तयार करण्यात अहमदनगर जिल्ह्यातील काम अव्वल ठरले आहे. मतदार नोंदणी आणि छायाचित्र सादर करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्याचे हे फलीत असल्याचे दिसते आहे.
मतदानाच्या दिवशी वास्तव्याच्या ठिकाणी नसलेल्या मतदारांची खोटी ओळखपत्रे तयार करून बोगस मतदानाचे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो समाविष्ट करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातही सर्व विधानसभा मतदारसंघांत छायाचित्रे संकलित करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. त्यामुळे यादीमध्ये प्रत्येक मतदाराचे छायाचित्र समाविष्ट करण्याचे काम ९९ टक्क्यांच्या वर पूर्ण झाले आहे.
---------
केवळ २४ मतदारांची छायाचित्रे नाहीत
गत तीन महिन्यांपूर्वी १२४ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नव्हती. संबंधित मतदारांना आवाहन केल्याने शंभर मतदारांनी त्यांची छायाचित्रे सादर केली. आता केवळ २४ मतदारांचीच छायाचित्रे विधानसभेच्या मतदार यादीत नाहीत. यामध्ये संगमनेर (१), कोपरगाव (६), अहमदनगर (१६) आणि श्रीगोंदा (१) अशा २४ जणांची छायाचित्रे विधानसभेच्या मतदार यादीत नाहीत. त्यांनी छायाचित्रे सादर न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.
-----------------
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
मतदारसंघ मतदार संख्या
अकोले २,५४,६५८
संगमनेर २,७२,६५०
शिर्डी २,६२,७३३
कोपरगाव २,६७,८८९
श्रीरामपूर २,९१,९८४
नेवासा २,६७,२५४
शेवगाव ३,४७,४९४
राहुरी २,९७,५८९
पारनेर ३,२८,४४५
अहमदनगर २,८८,८२५
श्रीगोंदा ३,१२,१०१
कर्जत-जामखेड ३,२८,५७८
एकूण ३५,२०,२००
--------------------
विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे छायाचित्रांसह समाविष्ट करण्यासाठी निवडणूक विभागाने कसोशीने प्रयत्न केले, जागृती केली. नवमतदारांचीही नोंदणी करताना ती छायाचित्रांसह झाली. त्यामुळे मतदार यादीमध्ये मतदारांच्या जवळपास शंभर टक्के छायाचित्रांचा समावेश झाला. छायाचित्रांमुळे बोगस मतदानाला आळा बसणार आहे.
- जितेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
--------------
डमी...नेट फोटोत
२६ नं. फोटोग्राफी ईन व्होटरलिस्ट डमी
मॅन ॲण्ड वुमन
मेल
व्होटर लिस्ट