कोथळे, तळे-विहीर, पाचनई, लव्हाळी, कुमशेत या दुर्गम आदिवासी भागात वन्यजीव विभागाने शेकरू प्रगणना पूर्ण केली आहे. कोरोना काळात बुध्द पौर्णिमेला होणारी वन्यजीव प्रगणना सलग दोन वर्षे झाली नाही. मात्र वन्यजीवने शेकरूची संख्या मोजली आहे. कोथळे-कुमशेत-पाचनईच्या कारवीच्या बंबाळ्या रानात नवे २४४ व १५२ जुने घरटे आढळून आले आहे. 'शेकरू'ची वाढत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. जंगल भागात वन्यजीवांची संख्या व शहरालगत ग्रामीण भागात चिमण्या कावळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राजूर व भंडारदरा वन्यजीव क्षेत्रात वन्यजीवचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, नाशिक विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी डी.डी. पडवळ (राजूर) यांच्या वन्यजीव कर्मचारी पथकाने प्रगणना कामगिरी पूर्ण केली आहे.