कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागत आहे. वय कितीही असू देत वेळेत व योग्य उपचार घेतले तर जीव वाचवू शकतो असा संदेश या प्रकरणातून समाजाला दिला आहे.
सुरूवातीस सखाहरी काकडे यांच्या घरातील सून कोरोना विषाणू बाधित आढळली. त्यानंतर चाचणीमध्ये त्यांच्या घरातील नात सून व मुलगा ही बाधित आढळून आला. प्राथमिक लक्षणे दिसल्यावर शंका म्हणून त्यांच्या मुलांनी व पुतण्याने त्यांची वयोवृद्ध व्यक्ती म्हणून काेरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीस राहुरीला खासगी दवाखान्यात उपचार घेण्यात आले. राहुरीत उपचार घेत असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली येण्यास सुरूवात झाली. त्यांच्या कुटुंबाने पुढील उपचारासाठी नगरला दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला . रात्रभर नगरमध्ये फिरून ही कोठेच त्यांना ऑक्सिजनचा बेड उपलब्ध होत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी खासगी दवाखान्यात ऑक्सिजनचा बेड मिळाला. तोपर्यंत त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ६० पर्यंत आली. ऑक्सिजन देऊनही प्राणवायूची पातळी वाढेना . अंतिम वेळी मग त्यांना व्हेंटिलेटर जोडण्यात आले. पंधरा दिवस दवाखान्यात उपचार घेऊन एक दिवसापूर्वी आपल्या कुटुंबांत ठणठणीतपणे दाखल झाले.
फोटो - सखाहरी काकडे