शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

११८५ गावांसाठी ८४ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर

By चंद्रकांत शेळके | Updated: December 12, 2023 20:43 IST

टँकरसाठी सर्वाधिक ८० कोटींची तरतूद : जूनपर्यंतच्या संभाव्य टंचाईवर होणार खर्च

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ११८५ गावांसाठी ८४ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात सर्वाधिक ८० कोटींची तरतूद टँकरसाठी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ॲाक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. काल (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यास मंजुरी दिली. चालू वर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत कमी पाऊस झाला. पहिले दोन महिने तर पावसाने ओढ दिली होती. सप्टेंबरअखेर झालेल्या पावसाने काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी ४४८ मिलिमीटर असताना यंदा केवळ ४०० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे १६ टक्के पावसाची तूट आहे. अजून हिवाळाच सुरू असतानाही जिल्ह्यात ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणखी तीव्र होईल, या अंदाजाने हा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सर्व निधी नैसर्गिक आपत्ती अनुदानातून खर्च होणार आहे. आराखड्यात यावर होणार खर्च

२९ गावांत आणि १६६ वाड्या-वस्त्यांवर नळयोजना प्रगतिपथावर आहेत. त्या पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. शिवाय अस्तित्वातील एका नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी दोन लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. १२ गावे आणि २ वाड्या अशा १४ ठिकाणी नवीन विहिरींसाठी ५.३१ लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. विहिरी खोल करण्यासाठी २ गावांत ४ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. टंचाई निवारणाची मोठी भिस्त खासगी विहिरींवर असल्याने १८८ गावे व ११३ वाड्यावर खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक कोटी ६९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. टँकरसाठी विशेष निधी

पावसाचे प्रमाण कसेही असले तरी जिल्ह्याच्या ठरावीक भागात उन्हाळ्यात टँकर सुरूच करावे लागतात. तीव्र दुष्काळ असेल तर टँकरची संख्या ५००च्या पुढे जाते. या उन्हाळ्यात ८९७ गावे व ३५५० वाड्यांसाठी टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यासाठी आराखड्यात सर्वाधिक ८० कोटी ९४ लाख खर्च गृहीत धरला गेला आहे. याशिवाय टँकर भरण्यासाठी वेगळ्या एक कोटी ६९ लाखांच्या निधीची तरतूद आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर