शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रिक्षासह आठ हजारांचा गांजा जप्त

By admin | Updated: April 18, 2016 00:36 IST

अहमदनगर : तालुक्यातील दौंड रोडवरील हिवरेझरे शिवारात एका रिक्षामध्ये घेवून जात असलेला आठ हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून पकडला.

अहमदनगर : तालुक्यातील दौंड रोडवरील हिवरेझरे शिवारात एका रिक्षामध्ये घेवून जात असलेला आठ हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून पकडला. प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक आनंद यांना नगर तालुका हद्दीतून एका रिक्षातून (एम. एच. १७) गांजा घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आनंद यांनी विशेष पथक तयार करून शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता दौंड रस्त्यावर सापळा लावला. त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये दोन किलो सुका, हिरवट रंगाचा आणि उग्र वास येत असलेला गांजा आढळून आला. हा गांजा सात हजार रुपये किमतीचा आहे. पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या चंद्रकांत संपत पवार (वय ५०, रा. वाघुंडे, ता. पारनेर) याला अटक केली. तसेच त्याची ६० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली. दोन्ही मिळून ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पवार याच्याकडील एक मोबाईल आणि एक सीमकार्डही जप्त केले आहे. पोलीस नाईक गोविंद गोल्हार यांच्या फिर्यादीवरून पवार याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक गोविंद गोल्हार, पोलीस कॉन्स्टेबल अशोक रोकडे, राजेंद्र शेंडे, राजेंद्र सुद्रिक, आनंद सत्रे, उमेश मोरे, चालक भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.