श्रीगोंदा: श्रीगोंदा मतदार संघात इन्फ्रा-टु अंतर्गत महावितरणाची सबस्टेशन, विद्युत रोहित्र व कृषी पंप कनेक्शन व नवीन पोलसाठी ७० कोटी मंजूर झाले आहे. सर्व कामे दीड वर्षात पूर्ण करण्यात येतील,अशी माहिती आ. बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. श्रीगोंदा तालुक्यात १५ सबस्टेशन चालू आहेत. हिंगण, मढेवडगाव, मांडवगण सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात येणार आहे. लिंपणगाव, मानगाव, गुंडेगाव, सबस्टेशनची कामे जून महिन्यात सुरु होतील. येळपणे, पेडगाव, पिंपळगाव, निमगाव, सबस्टेशनला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ४२ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. ६०० विद्युत रोहित्र, २ हजार कृषीपंप कनेक्शन तसचे कनेक्शनसाठी ४०० पोल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. चोराचीवाडी येथे ४४० केव्हीचे मुख्य स्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत. श्रीगोंदा शहरातील पोल व तारांचे जाळे कमी करण्यासाठी केंद्राच्या योजनेतून अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांसाठी १० कोटी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी रा. काँ. चे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काकडे, मिलींद दरेकर, राजेंद्र उकांडे, एम. डी. शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)घोडचे आवर्तन सोडण्यासाठी २६ ला मढेवडगाव येथे तर कुकडीच्या आवर्तनाबाबत विचारविनीमय करण्यासाठी २८ ला मुंबईत बैठक होणार आहे. घोडचे आवर्तन पूर्ण होण्यासाठी घोड व कुकडीवरील बंधार्याचा फळ्या काढणे अथवा चासकमान धरणातून पाणी आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे, असे पाचपुते म्हणाले. आर्वी अजगरेला सबस्टेशन झाले. परिसरातील कृषिपंप दुरुस्तीची दुकाने बंद झाली. सात सबस्टेशन झाली. तालुक्यातील मोटार रिवार्इंडींगची दुकाने बंद होतील, असे आ. पाचपुते म्हणाले.
महावितरणला ७० कोटी मंजूर
By admin | Updated: May 25, 2014 00:34 IST