शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:45 IST

पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते आठ दुकान फोडण्यात आली. सराफ दुकानातून दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने, पायातील जोडवे, पैंजण जोड असा ऐवज घेऊन चोरटे चार चाकी वाहनातून पसार झाले.चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. मागील आठवड्यातच सहा दुकाने फोडण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी शुक्रवारी रात्री पुन्हा दुकाने फोडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या निष्क्रियेबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चोरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. टाकळी ढोकेश्वर येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी भर बाजारपेठेत धुमाकूळ घातला. पोपट वाळुंज यांचे सार्थक हार्डवेअर, संजय उदावंत यांचे तेजश्री ज्वेलर्स, राजेंद्र उदावंत यांचे बालाजी ज्वेलर्स, मातोश्री फोटो, मातोश्री फुटवेअर तसेच ढोकेश्वर महाविद्यालयामधून एलसीडी टीव्ही चोरून नेला. सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान मळगंगानगर, जवाहर नवोदय रस्त्या जवळ हे चोरटे मोटारसायकल चोरून नेताना काही ग्रामस्थांनी पाठलाग केला. मात्र चोरटे पसार झाले होते. दरम्यान पोलीस गस्त सुरू असतानाच टाकळी ढोकेश्वर बायपासला ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातस्थळी पोलीस असतानाच रात्री दोनच्या सुमारास भरबाजार पेठेतील सात दुकाने फोडून चोरटे पसार झाले.या चोऱ्या करताना चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानासमोरील सीसीटीव्हीच्या वायर तोडून सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद केले. त्यानंतरही जे सीसीटीव्ही सुरू होते, त्यात तीन मिनिटात एक दुकान फोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या चार चाकी वाहनाचा अस्पष्ट दिसत असल्याने चोरांचा शोध घेणे पोलीस यंत्रणेला अवघड आहे.सायंकाळी ७ वाजताच चोरट्यांची सलामीशुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच चोरट्यांनी मोटारसायकल चोरून पहिली सलामी दिली. मोटारसायकल नेताना ग्रामस्थांनी पाठलाग केला, मात्र हातावर तुरी देत चोरटे पसार झाले. ही सलामी दिल्यानंतर पुन्हा रात्री सात दुकाने फोडली. अपघातास्थळी पोलीस असतानाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे चोर-पोलिसांचा हा खेळ संपणार कधी? असा प्रश्न ग्रामस्थ विचारीतआहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर