अहमदनगर : राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने २०१५ पर्यंत जिल्ह्यातील ६५२ गावे आणि वाड्यासाठी ३२९ योजनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यातील ९३ योजनांचे काम प्रगतीपथावर असून आॅगस्टपर्यंत ३२ योजनांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात जिल्ह्यासाठी २०१३ ते २०१५ या कालावधीसाठी ५९ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून सहा कोटी ५८ लाख रुपये खर्च झालेला आहे. एप्रिल महिन्यापर्यंत अकोले, कोपरगाव आणि कर्जत तालुक्यातून प्रत्येकी एक योजना पूर्ण झाली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिलेली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत ६५२ गावे आणि वाड्याचा समावेश आहे. या ठिकाणी ३२९ योजना मंजूर करण्यात आल्या असून ९३ ठिकाणी योजनेतील कामे प्रगती पथावर असून ४२ ठिकाणी योजनांना प्रशासकीय, आठ ठिकाणी तांत्रिक मंजूरी देण्यात आलेली आहे. २७ ठिकाणचे अंदाज पत्रक जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले असून आॅगस्ट महिन्याअखेर ३ योजना पूर्ण होणार आहेत. (प्रतिनिधी)तालुकानिहाय मिळालेला निधी आणि झालेला खर्चअकोले- सहा कोटी ६७ लाखांपैकी ८६ लाख, जामखेड तीन कोटींपैकी १५ लाख ७४ हजार, कर्जत तीन कोटी, कोपरगाव एक कोटी ९२ लाखांपैकी १३ लाख, नगर तीन कोटी ९१ लाखांपैकी ३८ लाख ७४ हजार, नेवासा दोन कोटी ४० लाखांपैकी २६ लाख ६५ हजार, पारनेर नऊ कोटी ९७ लाखांपैकी २२ लाख ९० हजार, पाथर्डी एक कोटी ४८ लाखांपैकी १९ लाख ७६ हजार, राहाता एक कोटी ५६ लाखांपैकी २४ लाख ५० हजार, राहुरी पाच कोटी ९३ लाखांपैकी ५९ लाख, संगमनेर दहा कोटी २२ लाखांपैकी दोन कोटी ७७ लाख , शेवगाव २८ लाख, श्रीगोंदा तीन कोटी ४३ लाख, श्रीरामपूर पाच कोटी ६१ लाखांपैकी ७३ लाख ५३ हजार.कामे सुरुच नाही योजनेचा कालावधी हा २०१५ पर्यंत असल्याने आतापर्यंत ४२९ गावात २३३ योजनेची कामे सुरूच झालेली नाहीत. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून निर्धारीत वेळेत योजना पूर्ण होणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ६५२ गावांना मिळणार शाश्वत पाणी
By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST