शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील ६१ आरोपी निर्दोष; नगर जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:39 IST

कर्जत तालुक्यातील शिंदे येथील दलित वस्तीवर हल्ला व मारहाण खटल्यातील ६१ आरोंपीची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त ता केली. शिंदे येथे ४ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी सिंदुबाई दत्तात्रय शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील शिंदे येथील दलित वस्तीवर हल्ला व मारहाण खटल्यातील ६१ आरोंपीची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त ता केली. शिंदे येथे ४ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी सिंदुबाई दत्तात्रय शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या खटल्याची जिल्हा न्यायालयात २०१३ पासून सुनावणी सुरू झाली. हा खटला लढविण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून औरंगाबाद येथील अ‍ॅड. संघमित्रा वाघमारे यांची नियुक्त केली होती. २००४ मध्ये शिंदे येथील दलित समाजातील व्यथांबाबत एका वृत्तपत्राने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दलित चळवळीतील नेत्यांनी शिंदे या गावात भेटी दिल्या होत्या. ४ मार्च रोजी मिराबाई आंबेडकर यांनी शिंदे येथे दलित वस्तीत भेट देऊन या समाजातील नागरिकांशी चर्चा केली. दुपारनंतर आंबेडकर गावातून निघून गेल्यानंतर गावातील काही लोकांनी संघटितपणे येऊन दलित समाजातील नागरिकांच्या घरांवर हल्ला करत तोडफोड करत मारहाण केली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात शिंदे येथील ६८ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम, कलम ३०७,३२६,३२४,१४७ आदी कलमाप्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या ६८ पैैकी तीन जण फरार, एक मयत तर तीन नावाचे माणसेच अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यामुळे ६१ जणांविरोधात हा खटला चालला़ खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी हा निकाल दिला. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. सुभाष काकडे यांनी हा खटला लढविला. त्यांना अ‍ॅड. सौरभ काकडे व अ‍ॅड. रोहित सिद्ध यांनी सहकार्य केले.

चौदा वर्षानंतर निकाल

शिंदे येथे २००४ रोजी दलित वस्तीवर हल्ला झाल्याची घटना घडली़ होती. या खटल्याचा तब्बल १४ वर्षानंतर निकाल लागला. सक्षम पुराव्याअभावी यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले़ निकालाच्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील संघमित्रा वाघमारे या उपस्थित नव्हत्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय