शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्ष आपण गंगाच साफ करतोय - पद्मश्री डॉ. शरद काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:55 IST

कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देया देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते.कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय

अहमदनगर : या देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते. कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शरद काळे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य ए. के. पंधरकर, डॉ. एस. बी. गायकवाड, प्रा. गिरिष कोकरेजा, प्रा. महेश आहेर आदी उपस्थित होते.डॉ. काळे म्हणाले, ४० टक्के अन्नाचा कचरा आपल्या देशात आहे. घरातील कच-याचे जर सेंद्रीय खत तयार केले तर देश अतिशय विकसित होवू शकतो. भारताचे कचरा उचलून फेकण्यावर रोज तीन कोटी रुपये खर्च होत आहेत. देशभर फिरुन जेवढे विज्ञान शिकलो नाही, तेवढे विज्ञान आईने शिकविले. कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्यापेक्षा शेती, शिक्षक व संशोधन हे कार्य अतिशय क्रियाशिल आहे. पण सध्याच्या युगातील युवा पिढीमध्ये हे कार्य करण्याची आवड नाही. यामुळे पुढील पिढीच्या आयुष्याची चिंता वाटते.प्रारंभी डॉ. चंद्रशेखर व्यंकटेशरमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

आम्ही चुकीच्या धर्मात सापडलो

सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानव. स्त्री-पुरुष ही जात आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले तर समाजातील सर्व वाद दूर होतील. सर्वाधिक सहिष्णुतेच्या देशात अडाणीपणामुळे अंदाधुंदपणा वाढला आहे. म्हणूनच आम्ही चुकीच्या धर्म संकल्पनांमध्ये अडकलो आहोत, असेही डॉ. काळे म्हणाले. आम्ही अल्कोहोल हे वाईट आहे, हे लोकांना सांगू शकत नाही आणि कसले आपण विज्ञान दिन साजरा करीत आहोत, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ़ काळे यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर