शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कार खरेदी करणा-या ६० जणांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:20 IST

महागडी कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून परराज्यातील ठगांनी गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील ६० जणांची आॅनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे़

अहमदनगर : महागडी कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून परराज्यातील ठगांनी गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील ६० जणांची आॅनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ फसवणूक झालेल्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहेत़ओएलएक्स या वेबसाईटचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे़आॅनलाईन साईटच्या माध्यमातून जुन्या वस्तुंची विक्री व खरेदी करण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे़ यासाठी ओएलएक्स ही वेबसाईट प्रसिद्ध आहे़ सायबर गुन्हेगारांनी अशा साईटच्या माध्यमातून पैसे लुबाडण्याचा प्रकार सुरू केला आहे़ गुन्हेगार या साईटवर कार विक्रीच्या जाहिराती टाकतात़महागडी आणि चांगल्या स्थितीतील जुन्या कारचा फोटो अपलोड करून किंमतही टाकली जाते़ किंमत मुद्दामहून कमी टाकली जाते़ तसेच संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिला जातो़ कमी किंमत पाहून जिल्ह्यातील ६० जणांनी कार तर काहींनी मोटारसायकल खरेदीची प्रक्रिया केली़

कारच्या मालकाला संपर्ककेल्यानंतर तो कारचे सर्व कागदपत्र व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून देतो़ प्रथमदर्शनी हे कागदपत्र खरे असल्याचे भासते़ खरेदी आधी दहा तेवीस टक्के रक्कम आॅनलाईन भरण्यास सांगितली जाते़ त्यानंतर तुमची कार पाठवून दिली आहे, असे सांगून आणखी पैसे पाठविण्याचे सांगितले जाते़ काहीतरी कारणे सांगून ४० ते ५० हजार रुपये खरेदीदारांकडून घेतले जातात़ त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक स्वीचआॅफ होतो किंवा प्रतिसाद दिला जात नाही़ अशाच पद्धतीने जिल्ह्यातील ६० जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे़आॅनलाईनच्या माध्यमातून जुनी अथवा नवीन वस्तू खरेदी करताना आधी समोरील विक्रेत्यांची विश्वासार्हता तपासावी़ कॅश आॅन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. वस्तू मिळाल्यानंतरच पैसे द्यावेत. चांगली वस्तू कमी अगदी कमी किमतीत मिळत असेल तर त्यात धोका आहे हे लक्षात घ्यावे़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी़ -प्रतीक कोळी,पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस स्टेशनवस्तू विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्या उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, दिल्ली या परिसरात कार्यरत आहेत़ त्यांनी जाहिरात केलेल्या कारवर प्रत्येक राज्यांचे बनावट पासिंग क्रमांक दिले जातात़ महाराष्ट्रातील पासिंग दिसली तर खरेदीदार लगेच संपर्क करतात आणि आॅनलाईन चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस