शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात वाटली ५ हजार अपंग प्रमाणपत्रे

By साहेबराव नरसाळे | Updated: July 7, 2018 16:32 IST

अहमदनगर : एकीकडे खऱ्या अपंगांना वर्ष-वर्ष चकरा मारूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र वाटल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. आता जिल्हा रुग्णालयाकडून एकाच वर्षात तब्बल ५ हजार ४४१ अपंगांची प्रमाणपत्रे वाटल्याची माहिती समोर आली आहे.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : एकीकडे खऱ्या अपंगांना वर्ष-वर्ष चकरा मारूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र वाटल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. आता जिल्हा रुग्णालयाकडून एकाच वर्षात तब्बल ५ हजार ४४१ अपंगांची प्रमाणपत्रे वाटल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा रुग्णालयाकडून तपासणी करून दिव्यांगांना अपंगत्वाची प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांनंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळतो.  जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना मोठे दिव्य पार पाडावे लागते, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला़ जिल्हा रुग्णालयाच्या या मनमानी कारभाराविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेनेही आवाज उठविला होता. मागील महिन्यात जिल्हा समाज कल्याण अधिका-यांकडे चार जणांनी वैयक्तिक लाभासाठी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केल्याची, तसेच वर्ष-वर्ष पाठपुरावा करूनही ख-या दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने नाकारल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कायदेशीर सल्ला घेऊन बनावट अपंग प्रमाणपत्र मिळविणा-यांविरोधात गुन्हा दाखल करू, असे सांगितले. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जुन्या कायद्यानुसार अपंगत्वाच्या सात प्रकारांनुसार प्रमाणपत्र देण्यात येते. यात सर्वाधिक अपघातांमुळे आलेल्या अपंगत्वाचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाने १ एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण ५ हजार ४४१ अपंगत्वाची प्रमाणपत्रे वाटली आहेत. अपघातांमुळे अपंगत्वाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.अपंग व्यक्ती अधिकार कायदा- २०१६ च्या कायद्यामध्ये २१ प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या सरकारच्या एस.एडी.एम.या संगणकीय प्रणालीद्वारे दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, या प्रणालीत नवीन अपंगत्वांच्या प्रकारांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे २०१६ च्या कायद्यानुसार जर कोणी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर तो बाद ठरविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दिव्यांगांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.अपंगत्वाचे प्रकार व प्रमाणपत्रांची संख्याअंध दिव्यांग - १०६४नाक, कान, घसा दिव्यांग - ६७९अस्थिव्यंग दिव्यांग - २६७८मनोविकृती दिव्यांग - १०२०बनावट अपंग प्रमाणपत्र वाटून जिल्हा रुग्णालयाकडून मूळ अपंगांवर अन्याय केला जात आहे. एकाच वर्षात ५ हजार ४४१ प्रमाणपत्र वाटणे म्हणजे संशयास्पद असून, या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी व्हावी.-अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय